मुंबईतील सर्वात आकर्षणाचा समजला जाणारा फेस्टिवल म्हणजे 'काला घोडा फेस्टिवल' (Kala Ghoda Festival 2020). यंदा 1 ते 10 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल मुंबईत रंगणार आहे. या फेस्टिवलचे यंदाचे 21 वे वर्ष आहे. त्यामुळे याची जय्यत तयारी सुरु असून या फेस्टिवमध्ये सहभागी होणारे तसेच या हे पाहायला येणारे लोक प्रचंड उत्सुक आहेत. यंदा या फेस्टिवलच्या माध्यमातून कोणता सामाजिक संदेश देण्यात येईल, काय काय कार्यक्रम असतील हे पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत. काला घोडा फेस्टिवल हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक वारसा जपणारा स्ट्रीट फेस्टिवल आहे.
21 व्या वर्धापन दिनानिमित्त यंदा विशेष तयारी कण्यात आली आहे. यंदाही या फेस्टिवलमध्ये डिझाईन, सिनेमा, संगीत, नृत्य, साहित्य यांसारख्या कलांचा अद्भूत नजारा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पाहूयात काय आहेत यंदाचे कार्यक्रम:
1) साहित्य: या विभागामध्ये जेरी पिंटो, नीना गोपाल व असे कितीतरी लेखक असमानतेची वागणूक, ईशान्येतील कविता, स्थापत्य कलेतील अवकाश व त्याचा प्रभाव अशा विषयांवर रोचक चर्चा करतील. यावेळी उषा उत्तप यांचे आत्मचरित्र, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कवितांच्या खास आवृत्तीचे प्रकाशन व असे कितीतरी पुस्तक प्रकाशन सोहळे पार पडणार आहेत.
2) लोकनृत्य: तान्या सक्सेना यांचे विविध भावना आणि रस प्रदर्शित करणारे भरतनाट्यम सादरीकरण
3) स्टँड अप कॉमेडी: अबीश मॅथ्यू, कनीझ सुरका, गुरसिमरन खंबा अशी स्टॅन्ड अप कॉमेडीच्या जगातील बडी बडी मंडळी महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी प्रेक्षकांना हास्य यात्रा घडवणार आहेत.
4) स्टँड अप कॉमेडी: अबीश मॅथ्यू, कनीझ सुरका, गुरसिमरन खंबा अशी स्टॅन्ड अप कॉमेडीच्या जगातील बडी बडी मंडळी महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी प्रेक्षकांना हास्य यात्रा घडवणार आहेत.
5) वर्कशॉप: उत्कर्ष पटेल आणि अरुंधती दासगुप्ता मुंबईला घडविणाऱ्या मिथक आणि कहाण्या आपल्यासमोर सादर करणार आहेत.
6) दृश्य कला: भावना सोनावणे – मोडी लिपीतल्या कविता – या कलाकृतीमधून पुरातन भाषा आणि झाडे यांसारख्या मूल्यांचा -हास दर्शवला गेला आहे. रुपाली मदन – भोवरा आणि त्याचा दोरा यांच्या दृश्य प्रतिमेतून मनुष्य आणि परमेश्वर यांच्यातील नैसर्गिक नाते दाखविण्यात आले आहे आणि आजच्या भौतिकतावादी जगामध्ये निरागसतेला पुन्हा एकदा स्थान मिळवून देणे अशा इतर कल्पनाही मांडल्या गेल्या आहेत.
गेल्या 21 वर्षांपासून काला घोडा फेस्टिवलला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद खूपच उल्लेखनीय आहे. वर्षागणिक प्रेक्षकांचा वाढत जाणारा प्रतिसाद हे काला घोडा फेस्टिवलची यशस्वी घोडदौडच म्हणावी लागेल.