Jagannath Rath Yatra 2024: जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात; पुरी येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही राहणार उपस्थित
Photo Credit - X

Jagannath Rath Yatra 2024: पुरीतील जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. भारतातील कोट्यवधी भाविकांसाठी ही यात्रा श्रद्धेचे स्थान आहे. या पावन उत्सवाला लाखो भाविकांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही (Droupadi Murmu) उपस्थित राहणार आहेत. जगन्नाथपुरी हे भारतातील चार धामांपैकी एक आहे. श्री जगन्नाथ मंदिर हे श्रीकृष्णाला समर्पित आहे. पृथ्वीवरचे वैकुंठ म्हणून देखील हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर हे ठिकाण नीलांचल, निलगिरी आणि शकक्षेत्र या नावांनीही ओळखले जाते. जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात पोहोचते. (हेही वाचा:Jagannath Rath Yatra 2024: दर 12 वर्षांनी देवाच्या मूर्ती का बदलल्या जातात? नवकलेवर विधी आणि त्याच्या गुप्त स्थानांतराचे रहस्य, जाणून घ्या )

रथयात्रे वैशिष्ट्य

जगन्नाथ रथयात्रेदरम्यान, श्रीकृष्ण, देवी सुभद्रा आणि बलराम यांच्यासाठी कडुनिंबाच्या लाकडापासून रथ तयार केले जातात. समोर मोठा भाऊ बलराम यांचा रथ, मध्यभागी बहीण सुभद्राचा रथ आणि मागे जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्णाचा रथ असे रथयात्रेचे स्वरुप असते. या तिन्ही रथांना वेगवेगळी नावे आणि रंग आहेत. बलरामजींच्या जीं रथाला तलध्वज म्हणतात आणि त्याचा रंग लाल आणि हिरवा आहे. देवी सुभद्राच्या रथाला दर्पदालन किंवा पद्मरथ म्हणतात आणि हा रथ काळा किंवा निळा रंगाचा असतो. भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदीघोष किंवा गरुध्वज म्हणतात आणि हा रथ पिवळा किंवा लाल रंगाचा असतो. नंदीघोषाची उंची 45 फूट, तलध्वज 45 फूट उंच आणि देवी सुभद्राचा दर्पदलन सुमारे 44.7 फूट उंच आहे.

जगन्नाथांच्या मावशीच्या घरापर्यंत ओढला जातो रथ जगन्नाथ रथयात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात पोहोचते. मान्यतेनुसार या मंदिराला जगन्नाथाच्या मावशीचे घर म्हटले जाते. या ठिकाणीच विश्वकर्मांनी तिन्ही देवतांच्या मूर्ती बनवल्या हे जगन्नाथाचे जन्मस्थान असल्याचीही एक मान्यता आहे. येथे तिन्ही देवी- देवता सात दिवस विश्रांती घेतात. आषाढ महिन्याच्या दशमीला विधीपूर्वक रथ मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होतो.