International Tiger Day 2019: का साजरा करतात वाघ दिन? जगापुढे भारताचा आदर्श; घ्या जाणून
International Tiger Day | Image only representative purpose (Photo credit: File Image)

History and Significance of Tiger Day: वाघ म्हटलं की अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. पण, काळजाचा ठोका चुकवणारा हाच वाघ आज जगभरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कारण, जगभरात संख्येने लक्षवधी असलेल्या वाघांची संख्या आज काही हजारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकारनेही मग जागे होत वाघ वाचवा ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेतूनच मग आंतरराष्ट्रीय वाग दिन (International Tiger Day) साजरा केला जाऊ लागला. नॅशनल टायगर कंजर्वेशन अथॉरिटी सांगते की 2014 मध्ये अखेरची व्याघ्रगणना झाली. त्यानुसार भारतात आजमितीला केवळ 2226 इतकेच वाघ आहेत. अर्थात 2010 च्या व्याघ्रगणनेच्या तुलनेत ही संख्या समधानकारक आहे. 2010 मध्ये तर वाघांची संख्या केवळ 1706 इतकीच होती. आशा आहे की भविष्यातही वाघांची संख्या अशीच वाढत राहीन.

आंतरराष्ट्रीय परिषदेत वाघ दिनाची घोषणा

वाघ संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाघांची घटणारी संख्या थांबविण्याच्या उद्देशाने सन 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय वाघ दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. सन 2010 मध्ये रशिया येथील सेंट पीटर्सबर्ग येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीय वाघ दिनाबद्दल पहिल्यांदा घोषणा झाली. या परिषदेत 2020 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले.

जगभरात वाघांची संख्या घण्याची कारणं

वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ने दिलेल्या माहितीनुसार, आज घडीला जगभरातील वाघांची संख्य केवळ 3,900 इतकी आहे. 20 व्या शकाच्या सुरुवातीपासून जगभरतील वाघांची संख्या 95 टक्क्यांनी कमी झाली. 1915 मध्ये वाघांची संख्य एक लाखांहून अधिक होती. वाघांची संख्या घटण्यास अनेक कारणं आहेत. यात बेसुमार जंगलतोड, वनांची संख्या घटने, निसर्गावर आक्रमण करुन मानवाने जंगलांमध्ये केलेला शिरकाव, उभारलेल्या इमारती, वाघाचे कातडे, नखं आणि शरीराच्या इतर अवयवांची केली जाणारी तस्करी आदी कारणांमुळे वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात घटत आहे.

हायात असलेल्या आणि नामशेष झालेल्या वाघांच्य प्रजाती

प्राप्त माहितीनुसार आजघडीला साइबेरियन वाघ, बंगाल वाघ, इंडोचाइनीज वाघ, मलायन वाघ, सुमात्रन वाघ आदी वाघांची प्रजाती जिवंत रुपात पाहायला मिळतात. तर, बाली वाघ, कैस्पियन वाघ, जावन वाघ या प्रजातीतील वाघ पूर्ण नामशेष झाले आहेत.

भारत जगात आदर्श

दरम्यान, 1973 मध्ये तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी व्याघ्रसंवर्धनासाठी मोहीम सुरु केली. भारातील वाघांचे संख्या वैज्ञानिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि पारिस्थिक मूल्य अशा सर्व गोष्टींचे संवर्धन करणे हे य मोहिमेचे उद्दीष्ट होते. या मोहिमेमुळे आतापर्यंत 50 ठिकाणी व्याघ्रसंवर्धन प्रकल्प सुरु झाले आहेत. दरम्यान, वाघ वाचविण्यासाठी जगाच्या तुलनेत भारताने प्रचंड कष्ट घेतले आहेत. त्यामुळे व्याघ्रसंवर्धन मोहिमेत भारत हा जगात आदर्श ठरला आहे.