Diwali 2019: दिवाळीला घरात बनवा ‘सुगंधी’ आणि ‘आयुर्वेदिक’ उटणं
Ayurvedic Utane (Photo Credit - File Photo)

Diwali 2019: येत्या 27 ऑक्टोबरला दिवाळीचा सण (Diwali) साजरा होणार आहे. या सणासाठी सर्वांची लगबग सुरू झाली आहे. सध्या शहरातील सर्व बाजारपेठा दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंनी सजल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्या अंघोळीसाठी लोक विविध प्रकारचे साबण आणि उटणे (Utane) खरेदी करतात. मात्र, हे उटणे केमिकल पद्धतीने तयार केली जातात. त्यामुळे आपल्या त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही घरात आयुर्वेदिक पद्धतीने सुगंधी उटणं बनवू शकता. चला तर मग आयुर्वेदिक उटणं (Ayurvedic Utane) बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात.

दिवाळीच्या दिवशी पहाटे उटणे लावून आंघोळ करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. उटणे हा चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेला एक लेप आहे. हा लेप लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते.

हेही वाचा - Narak Chaturdashi 2019 Puja Vidhi: नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान करण्यामागचे कारण, पुजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

घरी उटणं करण्याची सोपी पद्धत -

मसूर डाळ पीठ - 110 ग्रॅम

आवळकाठी - 10 ग्रॅम

सरीवा - 10 ग्रॅम

वाळा - 10 ग्रॅम

नागर मोथा - 10 ग्रॅम

जेष्टमध - 10 ग्रॅम

सुगंधी कचोरा - 10 ग्रॅम

आंबेहळद   -  2 ग्रॅम

तुलसी पावडर - 10 ग्रॅम

मंजीस्ट -  10 ग्रॅम

कापूर - 2 ग्रॅम

हेही वाचा - Diwali Fashion Trends 2019: खणाचे क्रॉप टॉप ते पैठणी ड्रेस मुलींनो! यंदा दिवाळी मध्ये ट्राय करा 'हे' हटके ट्रेंडी लुक्स

वरील सर्व पदार्थ बारीक करून घ्या. अंघोळीच्या वेळी या कोरड्या पावडरमध्ये थोडे पाणी घाला आणि या मिश्रणाचा लेप आपल्या शरीरावर लावा. अशा पद्धतीने घरात तुम्ही आयुर्वेदिक आणि सुगंधी पद्धतीने उटणं तयार करू शकता. उटणं लावून अंघोळ केल्याचे अनेक फायदे आहेत. उटणं लावल्याने त्वचा कोरडी पडत नाही. तसेच उटण्यातील आंबेहळदीमुळे त्वचा मऊ ठेवण्यासाठी मदत होते. उण्यातील मसूर डाळीमुळे त्वचेवर उजळपणा येतो.