Narak Chaturdashi Puja Vidhi Muhurt in Marathi: दिवाळी म्हटलं की आपोआपच सर्वत्र उत्साह, आनंद, चैतन्य निर्माण होतो. दिवाळी हा सण केवळ 1 दिवसाचा नसून वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे चांगले 5 ते 6 दिवस हा सण चालतो. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे सण एकाच दिवशी आल्याने हा सण 5 दिवसांचा आहे. आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाचे. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो असे पुराणात म्हटले आहे. दिवाळी हा सण मांगल्याचा, पावित्र्य जपणारा असा सण आहे. त्यामुळे या सणादरम्यान असुर शक्तींचा नाश झाल्यामुळे या सणादिवशी अभ्यंग स्नान केले जातो. तसेच हे अभ्यंग स्नान करण्याचा शुभ मुहूर्त देखील असतो.
यंदा नरक चतुर्दशी दिवशी म्हणजेच 27 नोव्हेंबर दिवशी चंद्रोदयाचा मुहूर्त हा सकाळी 5.30 मिनिटांनी आहे. याचाच अर्थ आपण सकाळी 5.30 नंतर अभ्यंग स्नान करु शकता. तसेच या नरक चतुर्दशीचा प्रारंभ 26 ऑक्टोबरला सायंकाळी 3.46 होत असून 27 ऑक्टोबरला दुपारी 12.23 मिनिटांनी समाप्ती होणार आहे.
हेदेखील वाचा- Diwali 2019: दिवाळी सणाचा पहिला दिवस आणि वसुबारस साजरी करण्याची खास पद्धत घ्या जाणून
या दिवशी काय करावे:
चंद्रोदय व्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान करावे. त्यावेळी 'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।'मंत्र म्हणावा. अर्धी आंघोळ झाल्यावर आंघोळ करणार्याला औक्षण करावे. या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावावा. 'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।' हे सर्व केल्यानंतर तुमच्या घरात,दुकानात तसेच कार्यालय दिव्यांनी प्रज्वलित करावे. असे केल्यास नरकापासून मुक्ती मिळते असे पुराणकथेत सांगितले आहे.
हेदेखील वाचा- Diwali Fashion Trends 2019: खणाचे क्रॉप टॉप ते पैठणी ड्रेस मुलींनो! यंदा दिवाळी मध्ये ट्राय करा 'हे' हटके ट्रेंडी लुक्स
यामागील पुराणकथा:
यामागील कहाणी अशी आहे की नरकासुर नावाचा असुर मानवांना पीडा देत होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने त्याला वर दिला. त्यामुळे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची रीत पडली. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्रय आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते.
प्राचीन हिंदू साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी नरक चतुर्दशी दिवशी केला होता. म्हणून या दिवसाची पहाट धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात.