भारत यंदा 26 जानेवारी दिवशी देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन ( Republic Day) साजरा करत आहे. यावर्षी देखील कोरोना संकटाच्या सावटाखाली भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा होत असल्याने मर्यादित स्वरूपात आणि आटोपशीर पद्धतीने हा राष्ट्रीय सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. यंदादेखील तुम्ही प्रजासत्ताक दिनी पूर्वीप्रमाणे भव्य स्वरूपात ध्वजारोहण किंवा इतर सांंस्कृतिक कार्यक्रम करू शकणार नाहीत त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना, आप्तांना, मित्रमंडळींना थेट भेटून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी सोशल मीडीयामध्ये फेसबूक मेसेजेस, WhatsApp Status द्वारा Wishes, Quotes, HD Images, Greetings शेअर करत आजच्या दिवशी तुमचा देशाभिमान व्यक्त करा. त्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग कार्ड्स डाऊनलोड करून तुम्ही शेअर करू शकता.
भारताने 26 जानेवारी 1950 दिवशी संविधान स्वीकारले त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची पद्धत आहे. तर प्रत्येक राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. देशभर या दिवशी राष्ट्रभक्तीपर गाणी, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून शूरवीर, स्वातंत्र्यसेनानींना आपली आदरांजली अर्पण केली जाते. नक्की वाचा: Happy Republic Day 2022 Patriotic Quotes: भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी WhatsApp स्टिकर्स, 'जय हिंद' HD प्रतिमा, टेलिग्राम संदेश, सिग्नल ग्रीटिंग्ज आणि Facebook GIF .
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो!
भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भारत सरकारने 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय जनतेला हे संविधान सुपूर्त केले. दरम्यान, 26 जानेवारीलाच हे संविधान का स्वीकारले? या प्रश्नाचे उत्तर असे की, लाहोर अधिवेशनात पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी 26 जानेवारी 1930 या दिवशी तिरंगा फडकावत संपूर्ण (स्वातंत्र्याची) घोषणा केली. या दिवसाची आठवण म्हणूनच 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारतात राज्य घटना अंमलात आणण्याचा दिवस ठरवला गेला. तेव्हापासून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.