शीख धर्मीयांसाठी गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti) हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. गुरू नानक हे शीख धर्मियांचे संस्थापक आणि पहिले शीख गुरू होते. हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक पौर्णिमे (Kartik Purnima) दिवशी गुरू नानक जयंती साजरी केली जाते. यंदा त्यांची 552 वी जयंती साजरी केली जाते. गुरू नानक जयंती ही गुरू परब म्हणून देखील साजरा केला जातो. गुरू नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोर मध्ये झाला. गुरू नानक जयंती उत्सव हा पौर्णिमेच्या दोन दिवसांपूर्वी पासूनच सुरू केला जातो. यामध्ये अखंड पाठ, किर्तनासारखे कार्यक्रम केले जातात. मग या मंगलपर्वाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना, मित्र मंडळींना देण्यासाठी फेसबूक, व्हॉट्सअॅप द्वारा Wishes, Images, Quotes, HD Images द्वारा शेअर करा आणि आनंद द्विगुणित करा.
पाकिस्तान मध्ये असलेल्या करतारपूर साहिब हे शीखांच्या पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक आहे. असे मानले जाते की, याच गुरुद्वारामध्ये गुरु नानक यांचे निवासस्थान होते. Guru Nanak Jayanti : आयुष्य कसे जगावे याचा मूलमंत्र देणारे गुरुनानकांचे '9' बहुमोल उपदेश .
गुरू नानक जयंती शुभेच्छा
गुरुनानकांनी आपल्या शिष्यांना आपल्या ज्ञानातून महत्त्वाचे उपदेश दिले. असे उपदेश जे त्यांच्या शिष्याला दु:खातून बाहेर काढण्यासाठी व येणा-या संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देण्यास मदत करतील. त्यामुळे आजच्या दिवशी त्याचं स्मरण केले जाते. गुरु नानक देव जी यांनी लंगर परंपरा सुरु केली होती. जवळजवळ 15 व्या शतकात ही लंगर परंपरेचे आयोजन करण्याची सुरुवात केली गेली. गुरुनानक ज्या ज्या ठिकाणी गेले तेथे जमीनीवर बसूनच भोजन करायचे. त्यावेळी जात-पात, उच्च-नीच आणि अंधविश्वास संपवण्याच्या हेतूनेच लंगर ही परंपरा सुरु केली होती. कारण सर्वजण एकत्र बसून जेवण करु शकतात. गुरु नानक देव जी यांनी सुरु केलेल्या या परंपरेला शीख धर्मातील तीसरे गुरु अमरदास जी यांनी पुढे चालू ठेवली असून ती आतापर्यंत कायम आहे.