Guru Nanak Jayanti 2019: आयुष्य कसे जगावे याचा मूलमंत्र देणारे गुरुनानकांचे '9' बहुमोल उपदेश
गुरु नानक जयंती 2019 (Photo Credits: File Image)

Guru Nanak 550th Jayanti: गुरुनानक जयंती  हा सण शिखांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो. हा सर्वात पवित्र सण शिख, सिंधी लोकांचा आहे. शीख धर्मामध्ये दहा गुरु आहेत, गुरु नानक देव हे संस्थापक गुरु होय. या सर्व शीख धर्मगुरुंचे चरित्र हृदयाला भावणारे आणि आपल्याला प्रगती पथावर नेणारे आहे. त्यांचे त्याग महान आहेत. मानवता आणि सदाचरणाच्या रक्षणासाठी त्यांनी आपले सर्वस्व त्यागले. परमोच्च ज्ञानाचे सार त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत दिले.

अशा या महान गुरुंची आज 550 वी जयंती आहे. गुरुनानकांनी आपल्या शिष्यांना आपल्या ज्ञानातून महत्त्वाचे उपदेश दिले. असे उपदेश जे त्यांच्या शिष्याला दु:खातून बाहेर काढण्यासाठी व येणा-या संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देण्यास मदत करतील.

गुरुनानकांचे नऊ बहुमूल्य उपदेश:

1. पैशाचा लोभ नको

प्रत्येक काम कष्टाच असतं त्यासाठी मेहनत करूनच पैसे कमवायला हवेत.

2. ईश्वर एक आहे -

गुरुनानकांनी ' इक ओंकार .. 'हा मंत्र दिला आहे. अनेकदा गुरुद्वाराच्या परिसरात सकाळी तुम्ही ऐकला असेल. मन शांत करणारा हा मंत्र धर्म वेगळा असला तरीही ईश्वर एकाच आहे. देव चराचरात वसला आहे त्यामुळे पित्याप्रमाणे आपल्यावर लक्ष ठेवून रक्षण करणाऱ्या देवाच्या आपण लेकरांनी लेकरांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहायला हवे.

हेदेखील वाचा- Guru Nanak Jayanti 2019: गुरु नानक देव जी यांनी सुरु केलेल्या लंगर परंपरेविषयीचे महत्व जाणून घ्या

3. पैशांना योग्य ठिकाणी ठेवा -

पैशाच्या हव्यासापायी आपण अनेक गोष्टींचा आनंद गमावून बसतो. त्यामुळे खिशात पुरतील आणि गरज असेल तितक्याच पैशाच्या मागे धावा.

4. हक्क हिसकावून घेऊ नका -

कधीच कोणाचाच हक्क हिसकावून घेऊ नका. अपार कष्ट आणि मेहनतीने जे मिळेल जितकं मिळेल त्यामध्ये खुश रहा. गरजवंताला मदत करा.

5. स्त्रियांचा आदर करा -

स्त्रियांचा आदर करणं आवश्यक आहे. सामजात स्त्री -पुरुष दोन्ही समान आहेत.

6. जगावर विजय मिळवण्याचा मंत्र

जगावर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील दोष नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या दोषांवर मात करू शकलात तरच जग प्रेमाने जिंकू शकता.

7. कामाचा ताण टाळा -

कामाचा ताण टाळणं आवश्यक आहे. ज्या गोष्टीतुन तुम्हांला आनंद मिळतो तीच गोष्ट करा. यामुळेच तुम्ही तणावमुक्त आणि प्रसन्न राहू शकता.

8. विनम्रता -

जगाशी विनम्रतेने वागा. अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्यामुळे शत्रूला जिंकायचं असेल तर विनम्रतेने वागा.

9. जातीवाद टाळा -

गुरु नानकांनी कायम जातीवाद टाळण्याची शिकावन त्यांच्या प्रवचनांमधून दिली. सोबतच कायम सत्याचा मार्ग निवडा हा संदेश त्यांनी दिला आहे.

शीख धर्मीय उत्साहाने साऱ्या गुरूंचा जन्मदिन साजरा करतात. या उत्सवाला' गुरुपर्व' (GuruParv) असेही म्हटले जाते. गुरुनानकांची जयंती 'गुरुपूरब'(Gurpurab)म्हणून देखील ओळखली जाते. हा दिवस गुरु नानक प्रकाश उत्सव म्हणून साजरा केला जातो.