Gudi Padwa 2020 | Photo Credits: Wikipedia

Gudi Padwa 2020 Date & Importance: हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa) होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या (Chaitra Shukla Pratipada) दिवशी नवे वर्ष सुरू होते. त्यामुळे हा सण गुढी पाडवा म्हणून जल्लोषात साजरा केला जातो. हा शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे. दरम्यान हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यानेही त्याचं विशेष महत्त्व असते. यंदा जगभरात गुढी पाडवा सण 25 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. विजय, यश, समृद्धी याचं प्रतिक समजल्या जाणार्‍या गुढीचं पूजन करून तो साजरा केला जातो. दरम्यान या दिवसापासून राम जन्मोत्सवाचीदेखील सुरूवात होते. महाराष्ट्रासह देशभरात या दिवसापासून चैत्र नवरात्र (Chaitra Navrati) देखील साजरी केली जाते. त्यामुळे हिंदू बांधव या दिवसाचं औचित्य साधून शोभायात्रा, मिरवणूका काढतात. ढोल ताशांच्या धामधूमीत जंगी सेलिब्रेशन केलं जातं. दरम्यान गुढीपाडव्या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याचे पूजन केले जाते. गोडाधोडाचे पदार्थ बनवून नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो. Chaitra Navratri 2020 Dates: यंदा 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान चैत्र नवरात्र; इथे पहा तिथीनुसार तारखा

रामायण, महाभारतामध्ये गुढीपाडव्याबाबत वेगवेगळा कथा आहेत. दरम्यान रामायणातील पौराणिक कथांनुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवशी रावणाचा वध करून राम अयोद्धेमध्ये आले. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी आनंदाने गुढी उभारली. तर महाभारतामध्येही गुढी पाडवा साजरा केल्याचे उल्लेख आढळतात. दरम्यान या दिवसाचं औचित्य साधून नव्या कामांची सुरूवात केली जाते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये गौतमीपुत्राची सत्ता आल्याच्या आनंदामध्ये हा दिवस पाडवो किंवा उगादी म्हणून या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात जसा हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. तसाच तो सिंधी लोक चेटीचंड म्हणून ओळखतात. महाराष्ट्रात या दिवशी तरूणाई सार्वजनिक स्वरूपात हा सण साजरा करण्यासाठी एकत्र जमतात. शोभायात्रा काढतात.