Chaitra Navratri 2020 Start Date: हिंदू मान्यतांनुसार, चैत्र महिन्यापासून नववर्षाची सुरूवात होते. यंदा 25 मार्च दिवशी नवरात्र म्हणजे गुढीपाडवा (Gudhi Padwa) असल्याने ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान चैत्र नवरात्र साजरी केली जाणार आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्येही (Chaitra Navratri) देवीच्या 9 रूपाची आराधना करण्याची प्रथा आहे. नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा केल्यास माता देवी प्रसन्न होते आणि तिची आराधना करणार्यांवर आपला कृपा आशिर्वाद यांचा वर्षाव करते. हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते.
होळीच्या सणानंतर येणारी चैत्र नवरात्र ही वसंत ऋतूमध्ये येते. वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी पालवी येते. नवी फुलं बहरत असतात. सारी सृष्टी चैतन्यमय होते. वसंत ऋतूत साऱ्या सृष्टीमध्ये नवनिर्मितीचे दर्शन होते. निर्मितीच्या याच शक्तीचे पूजन चैत्र नवरात्रीमध्येही केले जाते.
चैत्र नवरात्र 2020 तिथी आणि तारीख
25 मार्च- प्रथमा तिथी, (गुढीपाडवा)
26 मार्च- द्वितीया तिथी,
27 मार्च- तृतीया तिथी,
28 मार्च- चतुर्थी तिथी
29 मार्च- पंचमी तिथी,
30 मार्च- षष्ठी तिथी
31 मार्च- सप्तमी तिथी
1 अप्रैल- अष्टमी तिथी
2 अप्रैल- नवमी तिथी
दरम्यान हिंदू भाविक नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी मां शैलपुत्री, दुसर्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसर्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंदमाता, सहाव्या दिवशी कात्यायनी, सातव्या दिवशी कालरात्रि, आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी सिद्धिदात्रि देवीच्या रूपाची आराधना केली जाते.
हिंदू धर्मीय शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र यांच्यासोबतच आषाढ आणि माघ महिन्यात गुप्त नवरात्र साजरी केली जाते.