
Diwali Padwa 2023 Wishes: हिंदू धर्मात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीपासून कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपर्यंत दिवाळी (Diwali 2023) किंवा पंचमहापर्व साजरा करण्याची परंपरा आहे. दिव्यांसंबंधीचा हा सण काही दिवसांनी येणार आहे. अंधारावर प्रकाशाच्या विजयाशी संबंधित या सणाबाबत विविध धर्मांमध्ये वेगवेगळ्या समजुती आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2023) साजरा केला जातो. सोने खरेदी, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक कारणांसाठी या दिवसांचे विशेष महत्त्व आहे.
यंदा 14 नोव्हेंबरला मंगळवारी दिवाळी पाडव्याच्या सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सूवासिनी पतीचे औक्षण करतात. यामुळे पतीला दीर्घयुष्य लाभते, अशी श्रद्धा आहे. याशिवाय या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जात. तथापी, या दिवाशी सोशल मीडियाद्वारे लोक एकमेकांना दिवाळी पाडव्याच्या खास शुभेच्छा देतात. तुम्ही देखील दिवाळी पाडव्यानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा पाठवू शकतात. (हेही वाचा - Diwali Festival 2023 Dates: दिवाळीची पहिली आंघोळ, भाऊबीज कधी? पहा यंदा दिवाळीच्या 6 दिवसांच्या सेलिब्रेशनच्या तारखा)
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

धनाचा होवो वर्षाव
सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव
मिळो नेहमी समृद्धी अशी
होवो खास तुमची आमची दिवाळी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा...

आज बलिप्रतिपदा
दिवाळीचा पाडवा
राहो सदा नात्यात गोडवा
आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा!
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात
सदैव गोडवा यावा!
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो!
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या..
एकात्मतेचे लेणं लेऊया..
भिन्न-विभिन्न असलो तरी..
मनाने एक होऊया..
पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दरम्यान, बली प्रतिपदा हा सण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला साजरा केला जातो. बली प्रतिपदेला गोवर्धन पूजेसोबत बली पूजा देखील म्हणतात. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरीराज जी यांना समर्पित आहे. बली प्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. राजा बळीला भगवान विष्णूकडून अमरत्वाचे वरदान मिळाले आहे. अशा वेळी त्यांची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असा समज आहे.