Geeta Jayanati 2023 Sanskrit Messages: गीता जयंतीच्या शुभेच्छा देत शेअर करा WhatsApp Messages, Wishes द्वारा भगवंतांचे विचार!
गीता जयंती 2023 | File Image

मार्गशीर्ष एकादशीचा दिवस हा भगवद् गीतेच्या जयंतीचा (Geeta Jayanti) दिवस म्हणून साजरा केला जातो. पुराणकथेनुसार, रणभूमीवर भगवान श्रीकृष्णाने (Bhagvan Shri Krishna) अर्जुनाला (Arjun) जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. यानिमित्ताने या दिवशी गीताजयंतीचा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे. आजही गीतेतील उपदेश आपल्याला कठीण काळात मार्ग दाखवू शकतात. त्यामुळे हेच उपदेश आज जाणून घेत तुमच्या प्रियजणांसोबत, आप्तेष्टांसोबत शेअर करू शकाल. गीतेमधील हे उपदेश तुम्ही WhatsApp Messages, Status, Wishes, Images द्वारा शेअर करू शकाल.

भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. मग आज गीता जयंती निमित्त त्यातील काही गोष्टी तुम्ही देखील जाणून घ्या.

गीता जयंतीच्या शुभेच्छा

गीता जयंती 2023 | File Image

अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि

ततः स्वधर्मं कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि।।

गीता जयंती 2023 | File Image

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।

तस्मादपरिहार्येथे न त्वं शोचितुमर्हसि।।

गीता जयंती 2023 | File Image

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

गीता जयंती 2023 | File Image

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति नोरोपणानि।

तथा शरीराणि विहाय जीर्णान्य

न्यानि संयाति नवानि देहि।।

गीता जयंती 2023 | File Image

सुखदुखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।

तो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।

गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आहे. तिला उपनिषदाचा मान मिळाला आहे. गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. त्यामुळे त्यातील विचार आपल्याला अनेक कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी फायद्याचे ठरतात. विद्या प्राप्त करून घ्यायची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे.