Ganeshotsav 2019: दीड दिवसाने का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या सविस्तर
Ganesh Visarjan (Photo Credits: Facebook)

गणेश चतुर्थीला मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झाले. हे गणपती आता पुढील काही दिवस आपल्या घरी विराजमान झालेले दिसतील. तर काही ठिकाणी आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनही (Ganesh Visarjan) पाहायला मिळेल. महाराष्ट्राचे लाडकं दैवत गणपती हा काहीं कडे दीड दिवस, काहीं कडे 7 दिवस तर काही कडे 11 दिवस विराजमान असतो. असे असताना देखील ब-याच जणांकडे दीड दिवसाने या गणपतीचे विसर्जन का केले जाते असा प्रश्न ब-याच जणांना पडलेला असतो. अनेक घरगुती गणपतींचे विसर्जन दीड दिवसाने होते.

याची कारणे देखील वेगवेगळी आहेत. सध्याच्या घड्याळ्याच्या काट्यावर चालणा-या लाईफस्टाइलमुळे नोकरी, धंदा करणा-यांकडे जास्त वेळ नसतो. तसेच घरातील नोकरी, व्यवसाय करणा-या लोकांमुळे 10 दिवस आदरातिथ्य करणे हे सर्वांना जपत नाही. म्हणून ही लोक दीड दिवसाने गणपतीचे विसर्जन करत असले तरीही यामागची खरे कारण काही वेगळच आहे.

हेदेखील वाचा- Ganesh Visarjan 2019 Muhurat: यंदा दीड, 5,7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्याचे मुहूर्त काय?

प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण (D.K.Soman) यांनी यामागची एक गोष्ट सांगितली आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारण चतुर्थीच्या दरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची. पूजा केल्यानंतर त्याच दिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जस जशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनचा पायंडा पडू लागला. हेदेखील वाचा-

मात्र अनेक ठिकाणी आजही चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा रूढ आहे. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे. शेवटी काय गणपतीच्या आदरातिथ्य करण्याचे दिवस कितीही असो पण त्यामागची भावना ही सर्वच गणेश भक्तांची सारखीच असते.