गणशोत्सवाची लगभग सुरु झाल्यापासूनच गणपती घरी किंवा मंडपात कधी एकदा विराजमान होतो याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली असत. तसेच गणपीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येते. परंतु गणपतीसाठी केले जाणारे उपवास, आरती पूजा याचे या काळात फार महत्व असते. एवढेच नाही तर कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी गणपतीचा आशीवार्द घेऊन ते पूर्ण केले जाते. त्यामुळे नव्या कामाला सुरुवात झाल्यानंतर कोणतेही अडथळे येऊ नयेत किंवा गणपतीची कृपावृष्टी सदैव आपल्यासोबत रहावी या दृष्टीने सुद्धा त्याची पूजा केली जाते. यंदा गणेशोत्सवाचा सण 2 सप्टेंबर पासून सुरु झाला.
आपल्या सर्वांचाच हा लाडका बाप्पा वर्षातून एकदा गौरींसह आपल्या सर्वांच्या भेटीस, आपल्या घरी राहावयास येतो. कोणाकडे दिड दिवस, तर कोणाकडे 5, 7 आणि 10 दिवसांसाठी हे बाप्पा असतात. लहान मुलांच्या आवडीचा हा बाप्पा कधी घरी येतो असे त्यांना वाटते. तर जाणून घ्या यंदाच्या गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे. याबाबत दृकपंचांग यांनी अधिक माहिती दिली आहे.
>>दीड दिवस गणपती विसर्जन मुहूर्त
सकाळी: 12.20 ते 01.55 मिनिटे
दुपारी: 03.31 ते 5.06 मिनिटे
संध्याकाळी: 08.6 ते 09.31 मिनिटे
रात्री: 10.56 ते 3.10 (मध्यरात्री, 04 सप्टेंबर)
>> 5 दिवस गणपती विसर्जन मुहूर्त
सकाळी: 06.01 ते 10.45 मिनिटे
दुपारी: 05.03 ते 06.37 मिनिटे
संध्याकाळी: 12.19 ते 10.54 मिनिटे
रात्री: 1.45 ते 03.11 मिनिटे (मध्यरात्री, 07 सप्टेंबर)
>> 7 दिवस गणपती विसर्जन मुहूर्त
सकाळी: 07.36 ते 12.19 मिनिटे
दुपारी: 01.53 ते 03.27 मिनिटे
संध्याकाळी: 06.35 ते 10.53 मिनिटे
रात्री: 01.45 ते 03.11 मिनिटे (मध्यरात्री, 09 सप्टेंबर)
>> 10 दिवस गणपती विसर्जन मुहूर्त (अनंत चतुदर्शी)
सकाळी: 06.04 ते 07.37 मिनिटे
दुपारी: 04.57 ते 6.30 मिनिटे
संध्याकाळी: 06.30 ते 09.24 मिनिटे
रात्री: 12.18 ते 01.44 मिनिटे (मध्यरात्री, 13 सप्टेंबर)
>>अनंत चतुदर्शी तिथी प्रारंभ: सकाळी 05.06 सप्टेंबर 12,2019
>>अनंत चतुदर्शी तिथी समाप्ती: सकाळी 07.35 सप्टेंबर 13,2019
तर गणपती बाप्पाला निरोप देताना त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दिसून येतो. तसेच सर्वजण या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा गजर करताना दिसून येतात. परंतु बाप्पाचे घरी आगमन ते विसर्जन सोहळ्यापर्यंतचा येणारा अनुभव हा सुखावह असल्याचे जाणवते.