दुर्गापूजा (Durga Pooja) हा नेहमीच हिंदू संस्कृतीचा (Hindu culture) अविभाज्य भाग राहिला आहे. देवी दुर्गाला सन्मान देणारा एक शुभ हिंदू सण (Hindu Festival) म्हणजे नवरात्र. नवरात्री (Navratri), जो प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे आणि संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. नवरात्र काळात अनेकांच्या घरी दुर्गा देवी (Goddess Durga) आगमन करते. अनेक सार्वजनिक मंडळेही दुर्गा देवीची प्रतिष्ठापणा करतात. यंदा शारदीय नवरात्री (Sharad Navratri 2022) उत्सव 26 सप्टेंबर 2022 रोजी घटस्थापनेने (Ghatasthapana) सुरू होईल आणि 5 ऑक्टोबर रोजी विजय दशमी (Vijay Dashami) दिवशी दुर्गा विसर्जनाने (Durga Visarjan) समाप्त होईल.
हिंदु पंचागानुसार दुर्गा पूजा उत्सव शरद ऋतूत आणि अश्विनच्या पहिल्या नऊ दिवसांमध्ये साजरा केला जातो. जो इंग्रजी महिन्यांनुसार शक्यतो सप्टेंबर / ऑक्टोबरमध्ये येतो. हिंदू सौर दिनदर्शिकेनुसार, ते अश्विनच्या पहिल्या नऊ दिवशी येते. (हेही वाचा, खास नवरात्रौत्सव आणि दांडीया राससाठी महिला काढतायत अनोख्या पद्धतीने टॅटू, पहा फोटो)
दुर्गापूजेचा इतिहास
देशाच्या बहुतेक भागांमध्ये, महिषासुर नावाच्या राक्षसावर दुर्गा देवीने मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. पुराणकथांमध्ये सांगितल्यानुसार देवीने वाईटावर मिळवलेला विजय म्हणजेच महिशासुराचा वध केला. नवरात्रीच्या सातव्या दिवशी, महासप्तमी नावाच्या दिवशी देवीने राक्षसाशी युद्ध सुरू केले आणि विजय दशमीला त्याचा वध केला. तेव्हापासून, देवी दुर्गा शक्तीचे प्रतीक म्हणून पूजली जाते.
दुर्गापूजेचे महत्त्व
वाईटावर चांग्लयाचा विजय आणि दृष्टांचा नाश म्हमून दुर्गा देवी ओळखली जाते. दुर्गा देवीला दहा हात असतात असे पुरान सांगते. या दहा हातांनी ती विविध प्राणघातक शस्त्रे वाहून नेते. सिंह हे तिचे वाहान आहे असे सांगतात. भवानी, अंबा, चंडिका, गौरी, पार्वती आणि महिषासुरमर्दिनी म्हणूनही तिला ओळखले जाते.
सुरुवातीच्या काही काळांमध्ये पश्चिम बंगालमध्ये दुर्गापुजा मोठ्या प्रमाणावर होत होती. मात्र, आता संपूर्ण भारतभर दुर्गापुजा केली जाते. या काळात राज्यनिहाय वेगवेगल्या परंपरा पाहायला मिळतात. अलिकडे सगळ्याच उत्सवांना मोठ्या इव्हेंटचे स्वरुप प्राप्त होते. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष, संघटनाही त्यात सहभागी होतात. परिणामी दुर्गा पुजा हा केंद्रबिंदू असला तरी उत्सव साजरा करण्याची पद्धती विचारानुरुप भिन्न भिन्न आढळते.