Navratri 2019: देशभरात आजपासून (29 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला (Shardiya Navratri) सुरुवात झाली आहे. याच सणाचा आनंद आता पुढील नऊ दिवस पाहायला मिळणार असून त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येते. तर देवी मातेच्या नऊ रुपांची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस असून देवीच्या नऊ रुपांपैकी एक शैलीपुत्री हिची आज पूजा केली जाणार आहे. शैलीपुत्री ही पर्वतराज हिमालय याची पुत्री असल्याचे मानले जाते. नवरात्रीत शैलीपुत्रीचे विशेष महत्व आहे तसेच नवरात्रौत्सव सणामध्ये खास महिलांमध्ये एक विशिष्ठ प्रकारचा आनंद दिसून येतो. याच पार्श्वभुमीवर गुजरात मध्ये नवरात्रौत्सवावेळी खेळला जाणाऱ्या गरब्याला फार महत्व असते. तर गरबा राससाठी महिला पारंपरिक पद्धतीचे कपडे घालून गाण्यांच्या ठेक्यांवर गरबा खेळताना दिसून येतात. मात्र यंदाच्या नवरात्रौत्सवासाठी महिला अनोख्या पद्धतीचे टॅटू काढताना दिसून येत आहेत.
यंदा सुरत मधील तरुणींना गरब्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचा ट्रेन्ड सुरु केला असून पाठीवर विविध प्रकारच्या टॅटूमधून मोलाचा संदेश देत आहेत. या तरुणींनी जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर त्याचे समर्थन करण्यासाठी त्या संदर्भात टॅटू काढत आहेत. तर कोणी चांद्रयान 2, वाहतुकीच्या नियमासंबंधित टॅटू काढले आहेत. या ट्रेन्डी टॅटूंचे फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत.(Navratri 2019 Wishes: घटस्थापना आणि नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, ग्रीटिंग्स, SMS, Wishes,Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन जल्लोषात साजरा करा शारदीय नवरात्र उत्सव)
Surat(Gujarat): Women pose with body paint tattoos during preparations for #Navratri and Raas Garba, yesterday pic.twitter.com/VeUnWQjjF5
— ANI (@ANI) September 29, 2019
मात्र दुसऱ्या बाजूला हैदराबाद येथे बजरंग दल यांनी गरबा रासचे आयोजन करणाऱ्यांना तंबी दिली आहे. बजरंग दल यांनी तंबी देत असे म्हटले आहे की, गरबा रासमध्ये सहभागी होण्यासाठी आधार कार्ड सोबत असणे अनिवार्य आहे. तसेच हिंदू मुलींसोबत दांडियादरम्यान छेडछाड करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली जाणार आहे. एवढेच नाही तर हिंदू समाजावतिरिक्त येथे कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही आहे.