Happy Navratri 2019 (Photo Credits: File Image)

Navratri  2019 Marathi Messages & Wishes: यंदा 29 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्रीची धूम रंगणार आहे. या नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या जागरामध्ये आदिशक्तीची पूजा, अर्चना केली जाते. दांडिया, रास गरबा यांच्यासोबत महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने नवरात्र साजरा करणारी मंडळी 'भोंडला' या खेळाचा देखील आनंद लुटतात. मग देवीचा जागर करण्यासाठी काही घरामध्ये घटस्थापना केली जाते. पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. मग नवशक्तीच्या जागरासोबत तुमच्या आयुष्यात आनंद, चैतन्य घेऊन येणार्‍या नवरात्री आणि घटस्थापनेच्या शुभेच्छा मराठमोळ्या पद्धतीने देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारा देऊन आनंद शेअर करा.  Navratri Colours 2019: यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते? पहा शारदीय नवरात्रीचं संपूर्ण वेळापत्रक

घटस्थापना हा नवरात्रीमधील पहिला दिवस असतो. तर दसरा म्हणजेच विजया दशमी साजरी करून हा नवरात्रोत्सवाचा सण साजरा केला जातो. घरगुती स्वरूपात या दिवसात घटाची पूजा केली जाते तर सार्वजनिक स्वरूपात देवीची मूर्ती आणून तिचा जागर केला जातो. रात्री देवी समोर दांडिया आणि गरबा खेळला जातो. मग तुम्ही देखील या सेलिब्रेशन सहभागी होण्यासाठी उत्सुक आहात? मग घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन तुमच्यासोबत तुमच्या मित्र-मैत्रिणींचा, परिवारातील लोकांचाही आनंद द्विगुणित करा. Navratri 2019: 'दगडी चाळीची आई माऊली', 'टेंभी नाका दुर्गेदुर्गेश्वरी' सह मुंबई, ठाणे मध्ये या सार्वजनिक नवरात्र मंडळांमध्ये खास असतो शारदीय नवरात्रोत्सव; पहा तेथे कसे पोहचाल?

नवरात्रोत्सव 2019 च्या हार्दिक शुभेच्छा

Happy Navratri 2019 (Photo Credits: File Image)

शरद ऋतूत रंगत असे

उत्सव नवरात्रीचा

ओसंडून वाहू दे आपल्या आयुष्यात

पूर नाविन्य आणि आनंदाचा

शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Navratri 2019 (Photo Credits: File Image)

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला

कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,

शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती

आणि शांती देवो!

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Navratri 2019 (Photo Credits: File Image)

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

 शुभ नवरात्री!
Happy Navratri 2019 (Photo Credits: File Image)

नवरात्रीच्या मंगल पर्वावर

माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,

सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…

तुमच्या सर्व मनोकामना

पूर्ण होवो, हीच प्रार्थना…

शुभ नवरात्री!

Happy Navratri 2019 (Photo Credits: File Image)

नारी तू नारायणी, नारी तू सबला

तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला

शुभ नवरात्री!

Happy Navratri 2019 (Photo Credits: File Image)

नवरात्र विशेष व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स

नवरात्रीच्या शुभेच्छा आता खास व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या मदतीने शेअर करण्याची देखील सोय आहे. याकरिता प्ले स्टोअर मध्ये 'Navratri', 'Happy Navratri 2019', 'Navratri Stickers', 'Navratri Photo Frames', असं सर्च करा.तुम्हांला अनेक कलरफूल व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स मिळू शकतात.

नवरात्रीच्या उत्सवामध्ये आता नऊ रंगांचंही विशेष महत्त्व असतं. प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड आहे. यामागे धार्मिक मह्त्त्व नसून वारानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याचा क्रम ठरवला आणि पाळला जातो. मग तुम्हीही यंदाच्या नवरात्रीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहात ना? शुभ नवरात्री!