Happy Shardiya Navratri 2019 Messages: यंदाची सुरूवात 29 सप्टेंबर 2019 पासून होणार आहे. घटस्थापना (Ghatasthapana) केल्यानंतर पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपाची आराधना केली जाते. नवरात्र (Navratri) म्हणजे आदिशक्तीचा जागर आहे. नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या उत्सवामध्ये देवीचा जागर केला जातो. महाराष्ट्रामध्ये नवरात्रीत 'भोंडला' खेळला जातो. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली जाते. नवरात्री आणि दांडिया, रास गरबा हे देखील समीकरण आहे. गुजराती पारंपारिक वेषभूषेमध्ये तरूणाई सजून दांडिया आणि रास खेळण्यासाठी एकत्र जमतात. आदिशक्ती म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असते. निर्मिती आणि नऊ या संख्येचे अतूट नाते आहे. जमिनीत पेरलेले बी नऊ दिवसांनी अंकुरते . गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने, नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नऊ ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. म्हणून नऊ दिवसात पूजा करून दररोज एक याप्रमाणे नऊ माळा बांधतात. नवरात्रीचा हा सण यंदा उत्साहाने साजरा करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात? मग या दिवसाचा आनंद द्विगुणीत करण्यसाठी व्हॉट्सअॅप, फेसबूक मेसेंजर यांच्या माध्यमातून खास शुभेच्छा संदेश शेअर करण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं... शेअर करा आणि मित्र मैत्रिणींसोबतच नातेवाईकांना नवरात्री सणाच्या शुभेच्छा द्या. Navratri 2019: घटस्थापना कशी करावी, त्याचे विधी, शुभ मुहूर्त काय? इथे पहा.
नवरात्री सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश
या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
आई जगदंबेच्या कृपेने आपणास
उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समाधान लाभो
हीच आई भवानी चरणी प्रार्थना !
शुभ नवरात्री
नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!
नवरात्री विशेष GIFs
नवरात्री सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवरंग. स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी असणार्या नवरात्रीमध्ये महिलांमध्ये समानतेची भावना निर्माण करण्यासाठी एकाच रंगाचे कपडे घालण्याची फॅशन आहे. यामागे धार्मिक नाही. नवरात्रीमध्ये नऊ दिवसात प्रत्येकी एका दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घातले जातात. मग जाणून घ्या कोणत्या यंदा नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग आहे. देशाच्या विविध भागामध्ये नवरात्रीचा सण वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात साजरा केला जातो मग तुम्ही यंदा हा सण कसा साजरा करणार आहात? हे आमच्यासोबातही नक्की शेअर करा.