Navratri Fashion Trends 2019: यंदा नवरात्रीत तुमचे सौंदर्य अधिक खुलवतील 'या' हटके आणि ट्रेन्डी साड्या (Photos)
नवरात्रीचा (Navratri) सण म्हटलं की महिलांमध्ये खरेदीची क्रेझ दिसून येते. तर नवरात्रौत्सादरम्यान 9 दिवस देवी मातेच्या पूजेसोबत तिला 9 रंगांचा विविध साड्या नेसवल्या जातात. त्याचप्रमाणे महिलासुद्धा देवीच्या रंगांचे वस्त्र घालून त्याचा आनंद द्विगुणीत करतात.
नवरात्रीचा (Navratri) सण म्हटलं की महिलांमध्ये खरेदीची क्रेझ दिसून येते. तर नवरात्रौत्सादरम्यान 9 दिवस देवी मातेच्या पूजेसोबत तिला 9 रंगांचा विविध साड्या नेसवल्या जातात. त्याचप्रमाणे महिलासुद्धा देवीच्या रंगांचे वस्त्र घालून त्याचा आनंद द्विगुणीत करतात. येत्या 29 तारखेपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार असून यंदाचे नऊ रंगाचे वेळापत्रक आधिच सोशल मीडियात पहायाला मिळत आहे. त्यानुसार आता महिला नवरात्रीच्या नऊ दिवसांचे रंग पाहून त्यांचा कार्यक्रम ठरवत असल्याची लगभग सुरु झाली आहे.
नवरात्रौत्सवासाठी महिलांकडून महिनाभर आधीच त्याच्या तयारीला सुरुवात केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसाचा आनंद हा मन प्रसन्न करणारा असतो. तसेच नवरात्रीच्या दिवसात दांडिया, रास गरबा हे त्यांच्यासाठी खूप विशेष असते.त्यामुळे जर तुम्ही यंदाच्या नवरात्रौत्सवात साडी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास या हटके आणि ट्रेन्डी साड्या तुमचे सौंदर्य अधिक खुलवणार आहेत.
इन्स्टाग्रामवरील अबnoरmal या अकाउंटवर महिलांना नवरात्रीसाठी खास काठापदराची साडी आणि देवीच्या मुखाचे चित्र असलेले हटके ब्लाउज तुम्हाला खरेदी करु शकता.
parama_g या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरुन तुम्हाला सिंपल पण हटके अंदाजातील विविध साड्या नवरात्रौत्सवासाठी खरेदी करता येणार आहेत. खासकरुन पारंपरिक स्वरुपातील पण ट्रेन्डी लूक या साड्यांना देण्यात आला आहे.
तर हे होते बाजारात आलेले यंदाचे नवरात्रीसाठीचे खास पॅटर्न. तुमची यंदाची नवरात्री आणि विशेष दांडियाचा आनंद आणि उत्साह द्विगुणित करण्यासाठी हा फॅशन ट्रेंड तुमच्या नक्की उपयोगी येईल. नवरात्रोत्सव सुरु होण्यास अजून काही दिवस उरलेले असल्यामुळे जर तुम्ही अजून गरब्यासाठी शॉपिंग केली नसेल तर हा लेख तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.