
Navratri Special Fashion Trends: नवरात्री (Navratri) आता काही दिवसांवरच येऊन ठेपलीय, त्यामुळे गरब्यासाठी लागणारे कपडे, दागिने अन्य मॅचिंग वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व लोकांची बाजारात एकच झुंबड पाहायला मिळत आहे. नवरात्री हा विशेष करुन गुजराती लोकांचा वर्षातील सर्वात महत्वाचा आणि खास असा सण असतो. या सणासाठी ते महिनाभर आधीच तयारीला सुरुवात करतात. यात नवरात्रीत रंगणार दांडिया, रास गरबा हे त्यांच्यासाठी खूप विशेष असते. त्यात नवरंगाचे, नवढंगांचे कपडे परिधान करण्यासाठी त्यांची महिन्याभरापासून तयारी सुरु झाली असते. दांडिया आणि रासगरबा हा गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह अन्य शहरातही इतका लोकप्रिय असा नृत्यप्रकार झाला आहे की सर्वच धर्मांचे लोक हा गरबा एन्जॉय करताना दिसतात. त्यासाठी गरब्याचा संपुर्ण पेहरावाची खरेदी करतात. यंदाही बाजारात नवरात्रीनिमित्त बराच फॅशन ट्रेंड (Fashion Trends) पाहायला मिळत आहे.
यात कपड्यांपासून आकर्षक दागिने, पर्सेस, पगडी अशा गोष्टी बाजारात पाहायला मिळत आहे. मुंबईतील घाटकोपर, भुलेश्वर यांसह ब-याच बाजारपेठेत तुम्हाला नवरात्रीची खरेदी करता येईल. चला तर पाहूया यंदा नवरात्रीसाठी बाजारात आलेला नवा फॅशन ट्रेंड...
1. धोती
धोती ही फॅशन केवळ पुरुषांपुरता मर्यादित न राहता आता मुलींसाठीही रेडिमेंड आणि फॅन्सी धोतीची फॅशन बाजारात आलेली आहेत. त्यात आकर्षक अशा युनिसेक्स धोती आल्या आहेत.

2. जॅकेट्स
आजकालच्या तरुणींना तसेच महिलांना विशेष करुन नोकरीवर जाणा-या स्त्रियांना चनिया चोली परिधान करणे अवघडल्यासारखे वाटते. अशांसाठी बाजारात काचा आणि आकर्षक नक्षीकाम केलेले जॅकेट्स पाहायला मिळतील. हे जॅकेट्स तुम्ही जीन्स किंवा धोतीवर परिधान करु शकतात.

3. चनिया चोली , घागरा आणि टॉप
दरवर्षी प्रमाणे यंदाही बाजारात आकर्षक असे चनिया चोली आणि घाग-यांचे जबरदस्त पॅटर्न पाहायला मिळतील.

हेदेखील वाचा- Navratri 2019: मुंबई मध्ये भुलेश्वर ते नटराज मार्केट कुठे कराल यंदा ट्रेंडी चनिया चोळीची खरेदी?
4. पुरुषांचे केडीयू पेहराव .
पुरुषांचे नवरात्री स्पेशल यंदाही केडीयूमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. तसेच लहान मुलांसाठीही पारंपारिक पद्धतीचे असे केडीयू पाहायला मिळतील

5. ऑक्साइड ज्वेलरी
घागरा आणि चनियाचोलीवर ऑक्साइडची ज्वेलरी विशेष खुलून दिसते. म्हणून यंदाही बाजारात नेकलेस, चोकर, पेंडंट्ससह अंगठी, झुमके, कमरपट्टा आले आहेत.

6. लोकर आणि मोत्यांपासून बनवलेली ज्वेलरी
बाजारात यंदा लोकर आणि मोत्यांपासून बनवलेली आकर्षक ज्वेलरीही आली आहेत. त्यात बाजूबंद, मांगटिका, कडा, झुमके, ब्रेसलेट, यांसारखे दागिने पाहायला मिळतील.

पाहा व्हिडिओ:
तर हे होते बाजारात आलेले यंदाचे नवरात्रीसाठीचे खास पॅटर्न. तुमची यंदाची नवरात्री आणि विशेष दांडियाचा आनंद आणि उत्साह द्विगुणित करण्यासाठी हा फॅशन ट्रेंड तुमच्या नक्की उपयोगी येईल. नवरात्रोत्सव सुरु होण्यास अजून काही दिवस उरलेले असल्यामुळे जर तुम्ही अजून गरब्यासाठी शॉपिंग केली नसेल तर हा लेख तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.