Navratri 2019: रासगरबा आणि दांडिया खेळण्यासाठी मुंबईत 'ही'  ठिकाणे ठरतात पहिली पसंती; यंदाची तारीख, वेळ आणि तिकिटांचे दर जाणून घ्या
Best dandiya events in Delhi, Mumbai, Ahemdabad, Kolkata (Photo Credits: WikiCommons)

Dandiya and Garba Events Near Me During Navratri 2019: भारतीय संस्कृतीचा अमूलाग्र भाग म्हणजे आपल्याकडील सण उत्सव, श्रावणानंतर या सणांची अशी काही रेलचेल सुरु होते की  दिवाळी पर्यंत सर्वत्र सेलिब्रेशन मूड पाहायला मिळतो. अशातच आता साऱ्यांना शारदीय नवरात्रीचे (Navratri 2019) वेध लागले असतील. देवीरुपी शक्तीचा सन्मान करण्याचा हा सोहळा मुंबई, कोलकाता (Kolkata), अहमदाबाद (Ahemdabad) सह देशभरात अनेक ठिकाणी साजरा मोठ्या स्तरावर साजरा केला जातो. या सणाची आणखीन एक खासियत म्हणजे रासगरबा व दांडियाचा सोहळा. मागील काही वर्षात तर या गरबा दांडियाची क्रेझ इतकी वाढली आहे की अलीकडे काही ठिकाणी खास दांडिया नाईट्स (Dandiya Night) चे सुद्धा आयोजन केले जाते.

Navratri 2019: घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

यंदा देखील मुंबईत काही खास गरबा नाईट्स आयोजित करण्यात आल्या आहेत, तुम्हाला सुद्धा आपल्या मित्रपरिवार किंवा कुटुंबासोबत याठिकाणी जाण्याची इच्छा असेल तर मुंबईतील अशी काही ठिकाणे, त्यांचे यंदाचे वेळापत्रक, आणि तिकिटाचे दर याचा हा एक धावता आढावा नक्की तपासून पहा.

डोम दांडिया नाईट्स (डीजे चेतस आणि Ramzat म्युजिक)

कधी: 28-29 सप्टेंबर ,संध्याकाळी 7  वाजता

कुठे: डोम, NSCI, SVP स्टेडियम, वरळी, मुंबई, '

तिकीट: 1,500 - 2,300

गरबा रास 2019 (Garba Raas 2019)

कधी: 28सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर, संध्याकाळी 8 वाजता

कुठे: द ललित, मुंबई

तिकीट: 799 - 4499

ठाणे रास रंग 2019 (Thane Raas Rang 2019)

कधी : 29 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता

कुठे: मॉडेला मिल कंपाउंड

तिकीट: 300 - 1,770

रेडियन्स दांडिया (Radiance Dandiya)

कधी: 29 सप्टेंबर- 8 ऑक्टोबर, संध्याकाळी 8.30 वाजता

कुठे: हॉटेल सहारा स्टार

तिकीट: 800 - 1200

रास लीला नवरात्री 2019 (Raas Leela Navratri 2019)

कधी : 30 सप्टेंबर- 7  ऑक्टोबर, संध्याकाळी 7 वाजता

कुठे : The Pier, रेडियो क्लब, कुलाबा

तिकीट: 300 - 3,304

कोरा केंद्र नवरात्री 2019 (Korakendra Navratri 2019)

कधी: 29 सप्टेंबर- 8 ऑक्टोबर

कुठे: आर. एम भट्टाड रोड, हरिदास नगर, बोरिवली (पश्चिम)

तिकीट: 630, 540, 720, 360 (प्रतिदिवशी वेगळे दर)

वास्तविक नवरात्र हा सार्वजनिक उत्सव असल्याने अनेक ठिकाणी गरबा खेळाला जातो मात्र त्यातही मुंबईतील ही काही ठिकाणे गरबा प्रेमींची पहिली पसंती ठरतात. याठिकाणी पारंपरिक रंगबेरंगी चनियाचोळी, चंदेरी आभूषणे आणि गरब्याच्या हटके बिट्स अशा एकंदरीत वातावरण निव्वळ धम्माल अनुभवायची असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की भेट देऊ शकता.