Chaniya Choli (Photo Credits : commons.wikimedia)

यंदा शारदीय नवरात्रीची (Navaratri)  सुरूवात 29 सप्टेंबर 2019 पासून होणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर नऊ रात्र आणि दहा दिवस आदिशक्तीचा जागर केला जातो. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये या नवरात्रीदरम्यान देवींच्या विविध रूपांची पूजा केली जाते. तर रात्री दांडिया आणि रास गरबा खेळून देवीसमोर खास नृत्यप्रकार साजरा केला जातो. महाराष्ट्रात भोंडला खेळला जातो तसाच दांडिया आणि रास हा मूळचा गुजरात प्रांतातील नृत्याचा प्रकार आहे. मात्र आजकाल नवरात्री आणि दांडिया हे समीकरण केवळ गुजरात पुरता मर्यादीत न राहता मुंबईसह अनेक मेट्रो पोलिटन सिटीमध्ये नवरात्रीदरम्यान दांडिया, रास आयोजित केली जाते. या खास सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तरूण, तरूणी खास पारंपारिक वेषभूषेत तयार होतात. तरूणींना विशेष आकर्षण असलेल्या चनिया चोळीमध्ये (Navratri) दरवर्षी बदलत्या फॅशन ट्रेंड्स सोबत विविधता बघायला मिळते. मग यंदाही तुम्हांला अशाच ट्रेंडी चानियाचोळी खरेदी करायची असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या. Navratri Colours 2019: यंदा नवरात्रीचे नऊ रंग कोणते? पहा शारदीय नवरात्रीचं संपूर्ण वेळापत्रक

ट्रेंडी चनिया चोळी घेण्यासाठी मुंबईत कुठे कराल शॉपिंग

1. भुलेश्वर -

भुलेश्वरमध्ये लेहंगा चोली आणि चनिया चोळीचे सारे प्रकार तुम्हांला पहायला मिळतील. हलक्या पॅचवर्कपासून ते अगदी आरसे आणि कवड्यांनी सजवलेली चनिया चोळी तुम्हांला भुलेश्वरच्या दुकानांमध्ये पहायला आणि विकत घ्यायला मिळेल. भुलेश्वरमध्ये एकाच ठिकाणी अनेक दुकानं असल्याने मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध असतील.

कसे जाल ? भुलेश्वरला जाण्यासाठी चर्निरोड स्टेशनवरून जाण्यासाठी 10-15 मिनिटांचा मार्ग आहे.

2. नटराज मार्केट, मालाड -

मालडच्या नटराज मार्केटमध्ये पारंपारिक गुजराती आणि राजस्थानी पद्धतीचे कपडे, साड्या मिळतात नवरात्रीच्या दिवसांव्यतिरिक्तही मालडच्या नटराज मार्केटमध्ये भरजरी कपडे, उंची साड्या घेण्यासाठी गर्दी असते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसात हमखास पारंपारिक कपडे घेण्यासाठी अनेकजण एकदा नटराज मार्केटला अवश्य भेट देतात.

कसे जाल ? मालाडचं नटराज मार्केट हे अगदी स्टेशनच्या नजिक आहे. एकाच अनेक दुकान आहेत त्यामुळे पर्यायही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

3.विलेपार्ले -

मालाडप्रमाणे पश्चिम उपनगरांमध्ये विलेपार्लेचं मंगलम मार्केटही प्रसिद्ध आहे. नव्या, जुन्या स्टाईलच्या अनेक चनिया चोळी येथे मिळतात.

4.गांधी मार्केट, सायन -

सायन, किंग्स सर्कल भागामध्ये गांधी मार्केट लोकप्रिय आहे. विविध प्रकारचे पारंपारिक आणि भरजरी लेहंगा चोली, चनिया चोळी या मार्केटमध्ये मिळू शकतात. लहान मुलांपासून तरूणींपर्यंत अनेकींसाठी येथे हमखास पर्याय उपलब्ध आहेत.

कसे जाल ?

गांधी मार्केट हे किंग्स सर्कल स्टेशनपासून अगदी जवळ आहे. सायन किंवा माटूंगा स्टेशनवरून तुम्ही येणार असाल तर बस किंवा टॅक्सीने गांधी मार्केटपर्यंत पोहचू शकता.

5. दादर

दादर पश्चिमेला बाहेर उतरल्यानंतर खूप दुकानं आहेत. दादर पश्चिमेला असलेल्या मार्केटमध्ये चनिया चोळी मिळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आजकाल महागड्या कपड्यांची खरेदी करण्यापेक्षा कपडे भाड्याने घेण्याकडेही अधिक कल आहे. यामध्ये दाग दागिन्यांपासून लहान मुलं आणि तरूण ते वयस्करांना त्यांची एका दिवसाची हौस पूर्ण करण्यासाठी भाड्यानेही अनेक ठिकाणी कपडे मिळतात.