दिवाळी हा प्रकाशाचा, रोषणाईचा आणि आनंदाचा उत्सव. सर्व सणांमध्ये मोठा असा या सणाच्या प्रत्येक दिवासाचे काही खास महत्त्व आहे. वसुबारस, धनत्रयोदशीपासून दिवाळी सुरु होत असली तरी नरक चतुर्दशीला पहिली अंघोळ असते. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केले जाते. पण अभ्यंगस्नान, कारीट फोडणे यामागे नेमका अर्थ काय? तर जाणून घेऊया नरक चतुर्दशीचे महत्त्व....
पूराणात अशी कथा आहे की- पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे नरकासुर नावाचा एक असूर राज्य करत होता. तो देव आणि मानवला फार त्रास देत असे. तसंच तो स्त्रियांनाही पीडा देत होता. त्याने सोळा सहस्त्र उपवर राजकन्या जिंकल्या आणि त्यांना एका कारागृहात कोंडून ठेवले. त्यांच्याशी विवाह करण्याचा त्याचा मानस होता. नरकासुराच्या या वागणूकीमुळे सर्वत्र हाहाःकार उडाला होता. हे समजताच श्रीकृष्णाने पत्नी सत्यभामेसोबत नरकासुरावर आक्रमण केले. त्याचा वध करुन सर्व राजकन्यांना मुक्त केले. मात्र मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, "आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकात पीडा होऊ नये." कृष्णाने नरकासुराला तसा वर दिला. त्यामुळे कार्तिक वद्य चतुर्दशी ही 'नरक चतुर्दशी' म्हणून मानली जाऊ लागली आणि त्या दिवशी लोक सुर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करु लागले. दिवाळीत नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान का केले जाते?
चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. त्यामुळेच अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून पायाखाली कारीट ठेचून त्याचा रस जिभेला आणि कपाळावर लावला जातो.
नरक चतुर्दशीचे शुभ मुहूर्त
अभ्यंगस्नान आणि पूजेचा शुभ मुहूर्त – सकाळी 4.30 से 06.27 पर्यंत