Dhantrayodashi Sanskrit Message, Greetings: हिंदू संस्कृतीमध्ये वसुबारसेबासून सुरु होणारा दिवाळी नावाचा सर्वात मोठा हिंदू सण धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थाने सुरू होतो. धनतेरस या नावानेही धनत्रयोदशी ओळखली जाते. खास करुन ती अश्विन किंवा कार्तिक या हिंदू कॅलेंडर महिन्यात कृष्ण पक्षाच्या 13 व्या दिवशी साजरी केली जाते. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, त्याच्या विधी आणि पद्धती भिन्न असू शकतात. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. लोक या दिवशी भांडी आणि सोन्या/चांदीचे दागिने खरेदी करतात. अधिक संपत्ती आणि समृद्धीसाठी या दिवशी नवीन व्यावसायिक सौदे केले जातात. या दिवशी लोक परस्परांना शुभेच्छाही देतात. आपणही या दिवशी Messages, Images, Greetings द्वारा आपल्या मित्र परिवारास धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकता. महत्त्वाचे असे की, या दिवशी शुभेच्छांसाठी खास संस्कृत मेसेज शेअर करुन आपण आपला आनंद इतरांसोबत सामायिक करु शकता.
धनत्रयोदशी हा शब्द 'धन' आणि 'तेरस' या शब्दांचा संयोग आहे. 'धन' म्हणजे संपत्ती आणि 'तेरस' म्हणजेच कृष्ण पक्षातील तेरावा दिवस. या दिवशी पूजा केल्याने कुबेर आणि लक्ष्मीदेवीची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर घरादाराला सुखसमृद्धी लाभते घरादाराचा उत्कर्ष होतो, असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मी, गणेश, धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. देवी सरस्वती, देवी महालक्ष्मी आणि देवी महाकाली ही लक्ष्मीची तीन रूपे आहेत ज्यांची पूजा करताना पूजा केली जाते.
भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण आणि उत्सावाला काहीतरी पौराणीक कथा असते. सहाजिचक धनत्रयोदशीलाही ती आहे.धनत्रयोदशीनिमित्त राजा हिमाची कथा सर्वात लोकप्रिय आहे. पौराणिक कथांनुसार, लग्नानंतर चौथ्या दिवशी एका ज्योतिषाने राजा हिमाला एक भाकीत सांगितले.
हे भाकीत ऐकून त्याच्या पत्नीने आपले सर्व मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने झोपण्याच्या खोलीच्या उंबरठ्यावर ठेवले आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावला. मृत्यूचा देव यम राजा हिमाला मारण्यासाठी आला तेव्हा तो नागाच्या वेषात होता. चमकणारे दागिने आणि दिव्यांच्या तेजाने नागांचे डोळे दिपले.
राजा हिमाला मारण्याऐवजी तो दागिन्यांच्या ढिगाऱ्यावर चढून बसला. त्याला राजाच्या पत्नीने गोष्टी सांगितल्या. विशेष म्हणजे हा नाग राजाच्या पत्नीने सांगितलेल्या रात्रभर गोष्टी ऐकू लागला. त्यातच दुसरा दिवस उजाडला. राजा हिमाचा प्राण न घेता यमाला परतावे लागले.
हा दिवस पुढे धनतेरस म्हणून साजरा केला गेला. त्याच्याच स्मृतींना उजाळा देत आजपर्यंत लोक दिवे लावतात आणि दागिन्यांनी सजतात. कुटुंबातील सदस्यांना मृत्यूच्या हातातून सुरक्षित ठेवण्यासाठी, दिवे किंवा तेलाचे दिवे लावले जातात. असे मानले जाते.
काही कथांमध्ये असेही सांगितले जाते की, धनत्रयोदशी हा आध्यात्मिक विजयाचा उत्सव आणि पाच दिवसांचा दिवाळी सण आहे. या दिवशी भक्त देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी, आयुर्वेद आणि आरोग्याची देवता, संपत्ती, समृद्धी आणि कल्याणासाठी आशीर्वाद मागतात. हिंदू पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की या सणावर भगवान धन्वंतरीची प्रार्थना करणार्यांना सर्व प्रकारच्या रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते. त्यामुले या दिवशी धन्वंतरीची प्रार्थना केली जाते.