Dhamma Chakra Pravartan Din 2020 HD Images: 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खास मराठी HD Greetings, Messages, Whatsapp Status, Wishes, Images शेअर करुन द्या बौद्ध बांधवांना शुभेच्छा
Dhammachkra Pravartan Din 2020 (Photo Credits: File Image)

64th Dhammachakra Pravartan Din 2020 HD Images: धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Pravartan Day) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar) आणि अंदाजे 600,000 अनुयायींचा, 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्मांतरण साजरा करण्याचा दिवस आहे. याच दिवशी भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती व म्हणून बौद्ध बांधवांसाठी हा महत्वाचा सण आहे. दरवर्षी नागपूरच्या दीक्षाभूमीसह महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस अशोक विजयादशमी म्हणूनही ओळखतात जातो. तारखेप्रमाणे 14 ऑक्टोबरला लाखो बौद्ध लोक धर्मांतर साजरे करण्यासाठी दीक्षाभूमी येथे जमतात. यंदाचा 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे,

नागपूर येथे 13 ऑक्टोबर 1956 रोजी सायंकाळी बाबासाहेबांनी, ‘मला संपूर्ण भारतात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणायचे आहे,’ अशी घोषणा करून 14 ऑक्टोबर 1956 रोजी ऐतिहासिक असे धम्म चक्र प्रवर्तन घडवून आणले. याच दिवशी सम्राट अशोकाची विजयादशमी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, बुद्धाच्या महापरिनिर्वाणला 2500 वर्षे पूर्ण झाली होती, अशा या दिवसाचे औचित्य साधून तुम्ही मराठी शुभेच्छापत्रे, SMS, Wishes, Images, WhatsApp Status, Greetings, Messages, HD Images च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा: धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोबर दिवशी साजरा करण्यामागील महत्त्व, इतिहास काय?)

Dhammachkra Pravartan Din (Photo Credits: File Image)
Dhammachkra Pravartan Din (Photo Credits: File Image)
Dhammachkra Pravartan Din (Photo Credits: File Image)
Dhammachkra Pravartan Din (Photo Credits: File Image)
Dhammachkra Pravartan Din (Photo Credits: File Image)

दरम्यान, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात. 2018 मध्ये 62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे 62,000 तर सन 2019 मध्ये 63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी 67,543 अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध भिक्षु व अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात, नागपूर येथे मुख्य दीक्षाभूमी असून याठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.