धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartan Din ) हा भारतात बौद्ध धर्मीयांसाठी एक प्रमुख सण आहे. हा सण बौद्ध धर्मियांकडून 14 ऑक्टोबर किंवा अशोक विजया दशमी (Ashoka Vijayadashami) दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने दीक्षा भूमीवर मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना आदरांजली अर्पण केली जाते. दरम्यान या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला होता त्यामुळे या दिवसाचं विशेष स्मरण केले जाते. जाणून घ्या या दिवसाचं काय आहे महत्त्व?
धम्मचक्र प्रवर्तन दिन काय आहे?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 दिवशी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता. हा दिवस दसरा अर्थात विजयादशमी चा देखील आहे. या दिवशी भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गतिमान केले आणि "धम्मचक्र प्रवर्तन" झाले. तेव्हापासून बौद्ध धर्मीय हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा करतात. या दिवसाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हटलं जाते.
इसवी सन पूर्व तिसर्या शतकामध्ये सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस अशिक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधून डॉ. आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिवव्शी धर्मांतर केले. नागपूर मध्ये 14 ऑक्टॉबर 1956 दिवशी 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि ही धम्मभूमी पुढे दीक्षाभूमी झाली. Dhamma Chakra Pravartan Din 2024: धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त निमित्त प्रवास करणार्या अनुयायांकडून टोल घेऊ नये; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधून लुप्त होत चाललेला बौद्ध धर्म पुन्हा पुनरूज्जिवित करण्याचे काम केले आहे. आता नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनी अनेक अनुयायी मोठ्या संख्येने येतात.