![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/02/Shivaji-Maharaj-Jayanti-Messages-6-380x214.jpg)
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 Messages in Marathi: अष्टपैलू, अष्टवधानजागृत, आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, लोकहितदक्ष, धर्माभिमानी मात्र परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न असा जाणता राजा... छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजे आणि जिजाबाई यांच्या पोटी, 19 फेब्रुवारी 1930 रोजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. यंदा सोमवारी शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी होणार आहे.
शिवरायांनी मोगल, आदिलशाही, निजामशाहीच्या अत्याचाराच्या कालखंडात हिंदवी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आजही शिवाजी महाराज हे सदैव मार्गदर्शक आहेत. शिवराय हे कुशल संघटक आणि राजनीतिज्ञ तर होतेच, मात्र त्यांना केवळ साम्राज्य उभा करायचे नव्हते तर रयतेचे कल्याण करायचे होते. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केले. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होते. महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही.
तर शिवजयंती निमित्ताने आपल्या जवळच्या लोकांना WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages च्या माध्यमातून द्या शुभेच्छा.
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Chhatrapati-Shivaji-Maharaj-Jayanti-Messages-4.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Chhatrapati-Shivaji-Maharaj-Jayanti-Messages-5.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/03-1.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/04-1-1.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/05-1-1.jpg)
दरम्यान, महाराजांनी 1647 मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे महाराजांनी 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. महाराजांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमी युद्धाची नवीन शैली (शिवसूत्र) विकसित केली. मराठे हे गनिमी युद्ध/गनिमी युद्धाचे जनक होते. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धती आणि न्यायालयीन शिष्टाचारांचे पुनरुज्जीवन केले आणि मराठी आणि संस्कृत या प्रशासनाच्या भाषा केल्या. 6 जून 1674 रोजी शिवाजीराजांचा रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला आणि ते छत्रपती झाले. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.