Chandra Shekhar Azad Death Anniversary 2019: 'दुश्मनांच्या गोळीबाराला सामना करुन आझादी मिळवू' म्हणणारे स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद
Chandra Shekhar Azad Death Anniversary 2019: 'दुश्मनांच्या गोळीबाराला सामना करुन आझादी मिळवू' म्हणणारे स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद (Photo Credits-Twitter)

Chandra Shekhar Azad Death Anniversary 2019: भारताच्या इतिहासात आजच्या दिवशी सुवर्ण अक्षरात नाव लिहिले गेलेले थोर स्वातंत्र्यसेनानी म्हणजे असे 'चंद्रशेखर आझाद' (Chandra Shekhar Azad). आझाद यांची आज बुधवारी (27 फेब्रुवारी) रोजी पुण्यतिथी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून इंग्रजांशी लढले. तसेच स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांना 27 फेब्रुवारी 1931 रोजी इलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्क (Alfred Park) येथे इंग्रजांविरुद्ध लढताना शहीद झाले. परंतु आजही इंग्रजांकडून 'आझाद' नावाचा सन्मान केला जातो.

चंद्रशेखर आझाद यांनी काही झाले तरीही जिवंतपणे इंग्रजांच्या हाती लागणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे 1931 रोजी अल्फ्रेड पार्क येथे आझाद यांना चारही बाजूंनी इंग्रज सैनिकांनी घेरुनही त्यांच्याशी यशस्वीपणे ते लढले. परंतु त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीत शेवटची गोळी शिल्लक राहिल्याने आता इंग्रजांना आपण जीवित सामोरे न जाण्यासाठी त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. आझाद यांनी त्यांनी घेतलेली शपथ पूर्ण केली. तसेच अल्फ्रेड पार्क येथे आपल्या सहमित्रांना बाजूला सारत आपण एकटे इंग्रजांशी लढणार असल्याचे आझाद यांनी सांगितले.

एकदा बनारसला संस्कृतचे अभ्यास करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला होता. आझाद यांना जेव्हा अटक झाली त्यावेळी ते इतके लहान होते की त्यांना पकडण्यात आले. ब्रिटीश न्यायालयाने 14 वर्षांच्या आझाद यांना बारा फटकयांची अमानुष शिक्षा दिली. फटक्यांच्या शिक्षेमुळे आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला व अहिंसेवरील त्यांचा विश्वास साफ उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्री प्रणवेश कनींनी त्यांना क्रांतीची शिक्षा दीक्षा दिली. परंतु आझाद यांनी आपण देशासाठी प्राणाची आहुती देण्याचा निर्णय घेत आयुष्याच्या शेवटा पर्यंत इंग्रजांशी यशस्वीपणे लढले. आपल्या अमुल्य आयुष्य फक्त स्वातंत्र्यलढ्यात घालवलेले आझाद देशासाठी हुतात्मे झाले.