Chaitra Navratri 2019 Ghatasthapana: चैत्र नवरात्री मध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना कधी, कशी कराल?
शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रीत देखील घट बसवण्याची प्रथा आहे. हे घट मातीचे असून त्याला सृष्टीचे रुप मानले जाते.
Chaitra Navratri Kalash Sthapana Timings and Puja Vidhi: शारदीय नवरात्रीप्रमाणे महाराष्ट्रासह देशामध्ये चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेदिवशी नव्या हिंदू वर्षाची सुरूवात होते. या दिवसापासूनच देशभरात पुढील नऊ दिवस 'नवरात्र' साजरी केली जाते. पहिल्या दिवशी घट बसवून पुढील नऊ दिवस देवी कात्यायनीची पूजा करतात. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. Chaitra Navratri 2019: चैत्र नवरात्र साजरी करण्यामागील महत्त्व काय?
कसा साजरा कराल नवरात्रीचा सण?
- नवरात्रीमध्ये घट बसवून पूजा करण्याचा नियम आहे. यासाठी शेतातील माती आणून जाड चौकोनी थर तयार केला जातो. यामध्ये पाच किंवा सप्तधान्ये जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे रूजवण्याची प्रथा आहे.
- मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घातल्या जातात.Chaitra Navratri 2019 Recipe: चैत्र नवरात्र दरम्यान आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह घरच्या घरी कसं बनवाल (Watch Video)
घट स्थापनेचा शुभ मुहूर्त
चैत्र नवरात्रीत प्रतिपदेला शैलपुत्री, द्वितीयेला ब्रह्मचारिणी , तृतीयेला चंद्रघंटा , चतुर्थीला कुष्मांडा, पंचमीला स्कंदमाता, षष्ठीला कात्यायिनी, सप्तमीला कालरात्री, अष्टमीला महागौरी व नवमीला सिद्धिदात्री या देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2019 12:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

