Chaitra Navratri 2019 Recipe: चैत्र नवरात्र दरम्यान आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह घरच्या घरी कसं बनवाल (Watch Video)
Chaitra Navratri 2019 (File Photo)

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यासोबतच महाराष्ट्रामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुढील नऊ दिवस चैत्र नवरात्र (Chaitra Navratri ) साजरी केली जाते. महाराष्ट्रात या चैत्र नवरात्रीमध्ये हळदी-कुंकू आयोजित केले. घरोघरी चैत्रगौरीची पूजा केली जाते. घरी येणार्‍या कुमारिकांना, सुवासिनींना आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह दिलं जातं. सणासोबतच वसंत ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेवर आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह फायदेशीर आहे. मग पहा घरच्या घरी आंबेडाळ आणि कैरीचं पन्ह कसं बनवाल? Chaitra Navratri 2019: चैत्र नवरात्र साजरी करण्यामागील महत्त्व काय?

  • आंबेडाळ

कशी कराल आंबेडाळ

तीन तास भिजवलेली चणाडाळ , किसलेली कैरी , खोबरं , कोथिंबीरं व फोडणीसाठी मिरची

चण्याची डाळ, कैरी यांना मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या. यावर हिंग, मिरचीची फोडणी घाला. मिश्रण नीट हलवून एकत्र करा आणि त्यानंतर मीठ व कोथिंबीर घालून खायला दिली जाते.

  • कैरीचं पन्ह

उन्हाळ्याच्या दिवसात डीहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीचं पन्ह. बाजारात अनेक कंपन्यांची कैरीचं पन्हं उपलब्ध असतात. मात्र त्यामध्ये प्रिझर्व्हेटीव्ह असू शकातात. त्यामुळे शरीराला फायदा होण्यापेक्षा धोका अधिक असतो. म्हणून घरच्या घरी देखील कैरीचं पन्ह बनवू शकता.

साहित्य-

मोठ्या आकाराच्या कैर्‍या , जिरपुडं , साखर, केशर व वेलची पुड

कैर्‍या उकडून त्याचा गर काढा. मिक्सरच्या भांड्यामध्ये गर, सुमारे 300 ग्रॅम साखर आणि वेलची पावडर चवीनुसार मिसळून एकत्र वाटून घ्या. हे मिश्रण तुम्ही फ्रीजरमध्ये साठवून ठेवू शकता. जेव्हा हवं असेल तेव्हा 2-3 चमचे पल्प आणि पाणी एकत्र करून थंडगार पन्ह बनवू शकता.

चैत्र महिन्यात उन्हाळा वाढायला सुरूवात होते. अशावेळेस ऋतूमानानुसार आहारात बदल करणं आवश्यक आहे. म्हणूनच उन्हाचा त्रास होऊ नवरात्रीशिवायही तुम्ही या पदार्थांचा हमखास आस्वाद घेऊ शकता.