Bhondala 2019 (Photo Credits: Youtube)

गुजरातचा (Gujarat) गरबा (Garba) ज्याप्रमाणे संपूर्ण देशात प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात (Maharashtra) भोंडल्याची विशेष परंपरा आहे. आश्विन पक्षात हस्त नक्षत्रापासून भोंडला सुरु होतो. राज्यातील विविध भागात हा भोंडल्याचा खेळ खेळला जातो. नावं जरी वेगवेगळी असली तरी परंपरा मात्र सारखीच. पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) या खेळाला हदगा (Hadga), कोकणात (Konkan) भोंडला तर विदर्भात (Vidarbha) या खेळास भुलाबाई (Bhulabai) म्हणतात. वास्तविक भोला म्हणजे शिव शंकर (Lord Shiva) आणि म्हणून भुलाबाई म्हणजे उमा-पार्वती. त्यामुळे भोंडल्याला भुलाबाई असे नाव पडले आहे. तरी स्त्रीया (Ladies) आणि मुली (Girls) हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांना आपल्या रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जात होते. तरी अजूनही ग्रामिण (Rural) भागात हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो.

 

या खेळानंतर (Game) वाटल्या जाणाऱ्या खिरापतीला (Khirapat) देखील खास महत्व आहे. खिरापत म्हणजे खाण्याचे पदार्थ. भगवान शंकर (Lord Shiva) आणि पार्वतीला हा खिरापतीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. तसेच ज्या स्त्रीया (Women) आणि मुली (Girls) हा खेळ खेळता त्या त्यांना ही विशेष खिरापत खिलवली जाते. तरी या खिरापतीत कुठलेही पाच पदार्थ (Food Dishes) असल्याची परंपरा आहे. (हे ही वाचा:- Dussehra 2022 Rangoli Designs: दसरा दिवशी 'या' आकर्षक रांगोळ्यांनी साजरा करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस)

 

भोंडल्याच्या कार्यक्रमात हत्तीला (Elephant) सर्वात जास्त मान दिला जातो. कोकण (Konkan) प्रांतात घराच्या अंगणात मधोमध पाटावर हत्तीची रांगोळी (Elephant Rangoli) काढून त्याभोवती लहान मुली फेर धरतात, यावेळी ऐलमा पैलमा सारखी पारंपरिक गाणी म्हंटली जातात. दरदिवशी वेगवेगळ्या घरात भोंडला खेळाला जात असल्याने या दिवसात खाण्यापिण्याची चंगळ असते.काही ठिकाणी पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2 अशा करत करत 9 व्या दिवशी 9 +1 (दसऱ्याची) खिरापत असते.