
भाऊबीज (Bhaubeej 2022) हा एक पारंपारिक हिंदू सण आहे. जो भारतात आणि जगभरातील भारतीय साजरा करतात. दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपावली (Diwali) सणामध्येच या सणाचा आंतर्भाव होतो. बहीण भावाच्या अतुट प्रेमाचे बंधन दाखवणारा हा सण मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. या सणाला बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिक्का लावतात आणि त्यांच्या आनंदासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतात. त्याला ओवाळतात. हा महत्त्वाचा प्रसंग भाऊ-बहिणीच्या नात्याचा आणि प्रेमाचा गौरव करतो. दिवाळीचा पाचवा दिवस भाऊबीज म्हणून साजरा होतो. मुख्य दिवाळीच्या दोन दिवसांनी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी घराघरांमध्ये आनंदाचे वातावरण असते. आनंदाच्या प्रसंगी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. आपणही डिजिटल युगात मोबाईलच्या माध्यमातून Whatsapp, Facebook, Instagram आणि ट्विटर अशा मंचावरुन एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी आम्ही येथे काही HD Images, Greetings देत आहोत. जे आपम एकमेकांना शुभेच्छा देताना नक्की वापरु शकता.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे इथल्या प्रथा परंपरा भिन्न असल्या तरी, विवधतेत एकता हे इथले वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एकच सण भारतातील विविध नावाने ओळखला जातो.

भाऊबीज सणाचेच उदाहरण घेतले तर, भाऊबीज हा सण एकाच भावनेने पण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. महराष्ट्रात हा सण भाऊबीज नावने ओळखला जातो. तर उत्तर भारतात हा सण भाईदूज नावाने ओळखला जातो. (हेही वाचा, Happy Diwali 2022 HD Images: दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Wallpapers, Greetings, साजरा करा दिव्यांचा उत्सव)

काही प्रदेशात 'भाई फोंटा', 'भैया दूज', 'भाऊ बीज', 'भात्रा द्वितीया', 'भाई द्वितीया' आणि 'भाथरू' द्वितिया आदी नावानेही ओळखला जातो.

पौराणिक कथेनुसार, नरकासुराचा वध केला (ज्याला आता दिवाळी म्हणून ओळखले जाते) त्या दिवशी भगवान कृष्णाने आपली बहीण सुभद्राला भेट दिली. सुभद्राने कपाळावर टिळक लावून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जाऊ लागला.

'भाऊ' आणि 'बीज' हे दोन्ही शब्द अमावस्येनंतरच्या दुसऱ्या दिवसाला सूचित करतात. त्यामुळे दिवाळीच्या अवघ्या दोन दिवसांनी भाऊबीज साजरी केली जाते.

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला पाळली जाते. याला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी भगवान चित्रगुप्ताचाही सन्मान केला जातो.