शेख हसीना (Hasina from India) यांनी पंतप्रधान पदावरुन पायउतार होत देश सोडल्यानंतर भारताचा शेजारी बांग्लादेशमध्ये (Bangladesh) अनेक घडामोडी घडत आहे. अल्पसंख्याकांवरील अत्याचारांनी अत्युच्च टोक गाठल्यानंतर आता नव्याने सत्तेत आलेले मुहम्मद यूनुस ( Muhammad Yunus) यांचे अंतरीम सरकारही अल्पसंख्याक समूदयावर निर्बंधांचाच कित्ता गिरवत आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने नुकताच अजान (Azaan) आणि नमाज (Namaz) दरम्यान दूर्गापूजा उत्सव साजरा करता येणार नाही. तसेच, त्या काळात नागरिकांना संगीत अथवा आवाज करु नये असे, अवाहन केले आहे.
अल्पसंख्याक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
बांगलादेश सरकारने घेतलेल्या अनाकलनीय निर्णयामुळे या देशातील अल्पसंख्याक नागरिकांमध्ये नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशाच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार आणि माजी लेफ्टनंट कर्नल एमडी जहांगीर आलम चौधरी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, देशातील वाद्य विक्रेते आणि संगीत सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या व्यवसायिकांना कायदा आणि शांतता व सुव्यवस्था अबादीत ठेवण्यासाठी नमाज आणि अजान कालात ही सेवा उपलब्ध करुन देऊ नये असे सांगण्यात आले होते. या निर्देशांचे बहुतांश व्यवसायिकांनी पलन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'अझान आणि नमाझ दरम्यान सर्व प्रकारचे संगीत बंद'
टीओआयने, चौधरी यांचे विधान उद्धृत करत म्हटले आहे की, अजान आणि नमाज सुरु होण्यापूर्वी दूर्गापूजेनिमित्त सुरु असलेली सर्व संगीत प्रणाली (म्यूजीक सिस्टम) पाच मिनिटे आगोदर बंद होईल. दरम्यान भारत आणि बांग्लादेशही येत्या 9 ऑक्टोबर रोजी दूर्गापूजा साजरी करणार आहेत. लेफ्टनंट कर्नल चौधरी यांनी सांगितल्यानुसार, सर्व दूर्गापुजा उत्सव आयोजकांना विनंतीद्वारे अवाहन करण्यात आले आहे की, अझान आणि नमाझ दरम्यान सर्व प्रकारचे संगीत बंद करण्यात यावे. यंदाच्या वर्षी देशभरात (बांग्लादेश) 32,666 पूजा मंडळे दूरगापूजा उत्सव साजरा करत आहेत. त्यातील 157 केवळ उत्तर ढाका येथील आहेत. तर उर्वरीत 88 दक्षीण ढाक्यातील आहेत. सन 2023 मध्ये या मंडळांची संख्या 33,431 इतकी होती. मंडळांचा क्रमांक नेहमी कमी अधिक होत राहतो.
बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी सर्वात मोठा धार्मिक उत्सव असलेल्या दुर्गापूजेच्या आधी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत उच्चस्तरीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. चौधरी यांनी पुढे सांगितले की, देशभरात 32,666 पूजा मंडप (तात्पुरती उपासना स्थळे) उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 157 ढाका दक्षिण शहरात आणि 88 ढाका उत्तर शहर महामंडळांमध्ये आहेत. गेल्या वर्षीच्या 33,431 च्या तुलनेत किंचित कमी मंडप नियोजित असले तरी येत्या काही दिवसांत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.