उत्तर प्रदेशात एकाच प्रवेशद्वाराने हनुमान मंदिर, मशिदीत जाण्याचा मार्ग; हिंदू,मुस्लिम वर्षानुवर्ष सामंजस्याने करत आहेत प्रार्थना!
Kanpur temple, mosque share common entrance. (Photo/ANI)

भारताचं खरं सौंदर्य हे त्याच्यामधील विविधतेतही एकता जपणार्‍या संस्कृतीमध्ये आहे. सध्या देशभर मशिदीवरील भोंगे आणि अजान यांचा प्रश्न चर्चेचा बनला आहे. पण उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) चक्क हनुमान मंदिर (Hanuman Temple) आणि मशिदीकडे (Mosque) जाण्याचा प्रवेशद्वार एकच असून मंदिर ओलांडून मशिदीत जावं लागत असलं तरीही दोन्ही धर्मीय सामंजस्याने आपली प्रार्थना करत आहेत. मागील अनेक वर्षांपासून अशाचप्रकारे अजान आणि आरती होत असल्याचं स्थानिक सांगतात.

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) मधील टाटमील (Tatmill) भागात हिंदूंचं हनुमान मंदिर आणि मुसलमानांची मशिद एकाच आवारात आहे. या दोन्ही धर्मियांच्या आरत्या आणि अजान एकमेकांच्या वेळा सांभाळून केल्या जातात. आजही सकाळी या मशिदीमध्ये रमजान ईद निमित्त नमाज पठण झालं आहे. सोबत अक्षय्य तृतीयेनिमित्त पूजा अर्चना देखील झाली आहे.

मंदिर आणि मशिद एकाच भागात असून प्रवेशद्वार सारखे असले तरीही कधीही दोन्ही धर्मियांकडून कधीच वेगवेगळे प्रवेशद्वार हवेत यासाठी अद्याप मागणी झालेली नाही. दोन्ही धर्मिया मोठ्या गुण्यागोविंदाने आपले सण साजरे करतात. अशा वास्तूचं खरं आपण भारतीय असल्याचे दाखले देत असतात.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, युपीत अनधिकृत भोंगे मशिदीवरून उतरवण्यात आले आहेत. यावरून मनसेच्या राज ठाकरेंनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक देखील केले होते. 'ईदचा सण आनंदाने साजरा होऊ दे, अक्षय्य तृतीयेला कुठेही आरत्या करू नका'- Raj Thackeray यांचे आवाहन .

देशात मध्य प्रदेशातील खरगोन हिंसाचार, राजस्थानमधील जोधपूरमधील दगडफेक, दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार आणि इतरांसह गेल्या दोन महिन्यांपासून  विविध भागांमध्ये जातीय तेढातून संघर्ष पेटल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.