Police Officer Kicks Man Offering Namaz On Road (PC - X/@AshfaqueNabi)

Police Officer Kicks Man Offering Namaz On Road: देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) इंद्रलोक परिसरातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक पोलिस कर्मचारी रस्त्याच्या कडेला नमाज (Namaz) पढणाऱ्या व्यक्तीसोबत अपमानास्पद वर्तन करत आहे. हा पोलिस अधिकारी त्याला लाथ मारताना दिसत आहे. त्याचवेळी या घटनेबाबत काँग्रेस नेते भाजपवर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांनी 'एक्स'वर हा व्हिडिओ शेअर करून दिल्ली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रतापगढ़ी यांनी लिहिले आहे की, 'नमाज अदा करताना एका व्यक्तीला लाथ मारणाऱ्या या दिल्ली पोलिस जवानाला कदाचित मानवतेची मूलभूत तत्त्वेच समजत नाहीत. या जवानाच्या मनात काय द्वेष भरला आहे. या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. त्याच्यावर योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करा आणि त्याची सेवा समाप्त करा.' अशी मागणीही खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांनी केली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, डीसीपी (उत्तर) मनोज मीणा यांनी सांगितले की, दिल्ली पोलिस अधिकारी उत्तर दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कथितपणे मारहाण करताना दिसला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. (वाचा - Viral Video: जळगाव रेल्वे स्थानकावर रुळ क्रॉस करुन जाण्याच्या घाईत प्रवासी अडकले 2 गाड्यांच्या मध्ये; पहा हृद्याचा ठोका चुकणारा व्हीडिओ (Watch Video))

काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेट यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. सुप्रिया यांनी ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, 'हे अमित शाह यांच्या दिल्ली पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. शांतता सेवा न्याय. पूर्ण निष्ठेने काम करत आहेत.'

व्हिडिओमध्ये मेट्रोपूलाजवळ काही तरुण रस्त्याच्या कडेला नमाज अदा करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस कर्मचारी यावेळी तेथील मुस्लिम बांधवाशी गैरवर्तन करतो. पोलिस कर्मचाऱ्याच्या कारवाईनंतर तेथे जमाव जमा झाला.