AnnaBhau Sathe 50 th Death Anniversary | (File Image)

अण्णाभाऊ साठे यांची आज (18 जुलै) पुण्यतिथी (Annabhau Sathe 53rd Death Anniversary). यंदा त्यांची 53 वी पुण्यतिथी आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते ते शाहीर आणि बहुजनांचा आवाजही होते. त्यांनी लिहीलेली अनेक पुस्तके रशियामध्ये लोकप्रिय झाली आणि विविध भाषांमध्ये भाषांतरीतही  झाली. आजही त्यांच्या लेखणावर प्रेम करणारा वाचक मोठ्या प्रमाणावर आहे. तत्कालीन सामाजिक स्थिती आणि कौटुंबीक परिस्थिती यांमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. तरीसुद्धा त्यांनी आपल्या लेखणीतून क्रांतीचे स्फुल्लींग पेटवले. आंबेडकर आणि मार्क्सवादी विचार ही त्यांच्या लेखणातील प्रेरणा होती. त्यांनी आयुष्यभर बहुजनांचे आणि कामगारांचीच सुख-दु:खे लेखणीतून मांडली. आजही त्यांचे विचार अनेकांना भाराऊन टाकतात. पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांचे खास विचार. हे विचार आपण Facebook, Twitter, WhatsApp आणि इतर Social Media च्या माध्यमातूनही शेअक करु शकता.

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 या वर्षी झाला. तर 18 जुलै 1969 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे मुळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. मात्र, अण्णा भाऊ साठे म्हणूनच त्यांना महाराष्ट्र आणि जगभर ओळखले गेले. ते मातंग समाजातून येत. लोकशाहीर, समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अशी त्यांची सामाजिक ओळख होती. त्यांचे लिखान वास्तववाधी होते. साम्यवादाच्या प्रभावातून त्यांनी लिखाण, सामाजिक कार्य सुरु केले. मात्र, पुढे त्यांनी आंबेडकरी विचार आपालासा केला.

Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
Annabhau Sathe Death Anniversary | (File Image)
AnnaBhau Sathe 50 th Death Anniversary | (File Image)
AnnaBhau Sathe 50 th Death Anniversary | (File Image)
AnnaBhau Sathe 50 th Death Anniversary | (File Image)

अण्णाभाऊ साठे यांनी समाजपरिवर्तनासाठी लिखान केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडण आणि परिवर्तनवादी चळवळ यांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या लिखाणात नेहमीच उपेक्षीतांच्या जगण्याचा धांडोळा घेतला. उपेक्षीतांच्या अंतरंगाचा वेध हा त्यांच्या लिखाणाचा गाभा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोठे राहिले. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर ही काही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नावे आहेत. ज्यांनी आपल्या शाहीरीतून जनमानस ढवळून काढले.