Annabhau Sathe 50th Punyatithi: लोकशाहीर, सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेख अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांची आज (18 जुलै 2019) 50 पुण्यतिथी. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात १ ऑगस्ट इ.स. १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीच शाळेत गेले नाहीत. त्यांच्या शैक्षणीक कारकिर्दीचा मागोवा घ्यायचाच तर, ते केवळ दीड दिवस शाळेत गेले होते. शाळेत होणाऱ्या दलित सवर्ण भेदभावामुळे त्यांनी शाळाच सोडली. तरीही आपल्या लेखणीच्या जोरावर समाजमन ढवळून काढण्याची तागद त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी गायलेले पोवाडे, लेखण, रचना, समाजकार्य आणि राजकारण आजही लोकांच्या हृदयात आहे. अशा या अण्णाभाऊंची आज 50 वी जयंती (Death Anniversary) . त्यांच्या जयंतीनिमीत्त वाचा त्यांचे काही प्रेरणादायी विचार.
अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार
हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस - अण्णाभाऊ साठे
जग बदल घालूनी घाव, आम्हा सांगून गेले भीमराव - अण्णाभाऊ साठे
नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते- अण्णाभाऊ साठे
जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते. जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे- अण्णाभाऊ साठे
अनिष्ठ धर्माच्या आचरणाने मानसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे- अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत सुमारे 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यातील फकिरा (1959) या कादंबरीला प्रचंड यश मिळाले. या कादंबरीस राज्य सरकारने 1961 सालात उत्कृष्ट कादंबरी पुरुस्कार देऊन गौरविले. अण्णाभाऊ साठे यांनी काही लघुकथाही लिहिल्या. त्याचे लिखान भारतातील बहुतांश भाषांमध्ये अनुवादीत झाले आहे. तर भारताबाहेरही सुमारे 27 भाषांमध्ये अण्णाभाऊ यांचे लिखान अनुवादित झाले आहे.
अण्णाभाऊ यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनात जातीव्यवस्था, दलित सवर्ण संघर्ष, निसर्ग, स्थलांतरण, शहर आणि ग्रामिण जिवन यांतील संघर्ष असे अनेक पैलू पाहायला मिळतात. त्यांनी काही नाटकं, पोवाडे आणि मुंबईवरची लावणीही लिहिली. अण्णाभाऊंनी लिहिलेली मुंबईवरची लावणी आजही महाराष्ट्रातील तमाम श्रोते आणि शाहिरांना वेड लावते.