Ahilyabai Holkar Jayanti Wishes: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती दिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शरद पवारसह इतर राजकीय नेत्यांनी केले अभिवादन
Ahilyabai Holkar Jayanti| File Photo

Ahilyabai Holkar Jayanti Wishes: भारतीय इतिहासातील सर्वोत्कृष्ट योद्धा राणीमध्ये राणी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. आपल्या कारकिर्दीत राणी अहिल्याबाई यांनी मराठा मालवा साम्राज्याने यशाचा नवा उच्चांक गाठला. त्यांनी देशभरात बरीच हिंदू मंदिरे आणि धर्मशाळा बांधली. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे, 1725 रोजी जामखेड (सध्याचे अहमदनगर) महाराष्ट्रातील (Maharashtra) चोंडी गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. अहिल्याबाई होळकर एक सुशिक्षित स्त्री होती. (Ahilyabai Holkar Jayanti 2021 Messages In Marathi: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारी Greetings, HD Images, Photos!)

नितीन गडकरी

जितेंद्र आव्हाड

रोहित पवार

शरद पवार

मनीषा चौधरी

निलेश एन राणे

राष्ट्रवादी कॉंग्रेस

शशिकांत शिंदे

श्रीनिवास पाटील

डॉ. अभिलाष पांडे

अहिल्याबाई या मल्हारराव होळकरांच्या सून होत्या. मल्हारराव होळकर हे मराठा पेशवे बालाजी बाजीराव यांचे लष्करप्रमुख होते. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ. स. 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. 1745 मध्ये अहिल्याबाईंनी पुरूषराव नावाच्या मुलाला जन्म दिला परंतु त्यांचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन झाले.  1748 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या मुलीचे लग्न यशवंत राव या गरीब कुटुंबातील शूर मुलाशी केले. मल्हार होळकर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा नरराव यांनी राज्यभर सांभाळला आणि त्यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी 1767 राज्यभार स्वीकारला. दर वर्षी लोक 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करतात. यंदा 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांचा 296 वा वाढदिवस आहे. अहिल्याबाई खूप चांगल्या प्रशासक होत्या आणि इंदूर शहर त्यांच्या कारकिर्दीचे साक्षीदार बनले. त्यांनी आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभर पाण्याच्या टाक्या, रस्ते, घाट, धर्मशाळा इत्यादी मूलभूत सुविधा बांधल्या.