
भारतातील कुशल महिला प्रशासकांपैकी एक म्हणजे अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) . महाराष्ट्रात जन्म झालेल्या आणि नंतर मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांतावर सत्ता गाजवलेल्या अहिल्याबाई या आज अनेकांसाठी प्रेरणा स्थान आहेत. 31 मे हा अहिल्याबाईंचा जन्मदिवस त्यामुळे हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा दिवस (Ahilyabai Holkar Jayanti) महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातही विशेष असतो. यंदा कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे कोणताच कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी सरकारची परवानगी नाही पण सोशल मीडीयाच्या आजच्या या काळात अहिल्याबाई होळकर यांचा जयंतीचा दिवस फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), मेसेजेस, Wishes, HD Images, Photos शेअर करून नक्की साजरा केला जाऊ शकतो. मग तुमच्या मित्रमंडळींना, पुढील पिढीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कर्तृत्त्वाचा विसर पडू नये म्हणून ही लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली खास मराठमोळी शुभेच्छापत्र शेअर करायला विसरू नका
अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 साली महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. अहिल्याबाईंचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. नंतर अहिल्याबाई मल्हारराव होळकरांच्या घरी सून म्हणून आल्या आणि महाराष्ट्राची लेक पुढे 'तत्त्वज्ञानी राणी' झाली. Ahilyabai Holkar Jayanti 2021: वयाच्या 8व्या वर्षी होळकरांची सून ते 'तत्त्वज्ञानी राणी' पहा अहिल्याबाईंचा हा प्रेरणादायी प्रवास कसा होता?
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छापत्र





अहिल्याबाई प्रशासक होत्या पण त्यांनी प्रजेसाठी कल्याणकारी कामं करण्यात आपलं आयुष्य वेचलं. भारतभरामध्ये अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट त्यांनी बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मध्य प्रदेशातील महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या. अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधून त्यांनी भाविकांची गैरसोय टाळली. मंदिरांसाठी इअतकं काम करूनही त्यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला. सतीला विरोध करत त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे देखील काम केले.