भारताला स्वातंत्र्य मिळालेला सोनेरी दिवस (Independence Day) म्हणजे 15 ऑगस्ट. हा दिवस आपण ज्यांच्यामुळे पाहू शकलो त्यांना स्मरून, त्यांना श्रद्धांजली वाहून हा दिवस साजरा करतो. या दिवशी आपला भारत देश ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 150 वर्षे आपल्या देशातील लोकांनी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढली, अनेक हालअपेष्टा सहन केल्या. कित्येकांना फाशीची शिक्षाही झाली. तर कित्येकांना तुरुंगवासही भोगावा लागला. अशा शूर स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना, रणरागिनींना स्मरण्याचा त्यांना वंदन करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट.
विविधतेने नटलेल्या या सुजलाम सुफलाम अशा भारत देशाबद्दल अशा कित्येक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हीहा अचंबित व्हाल, जाणून घेऊया त्यातीलच काही महत्त्वाच्या आश्चर्यकारक गोष्टी:
1. सिंधू ही नदी भारताच्या प्राचीन इतिहासाचे एक फार मोठे सुवर्णस्थान आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्कृतींपैकी हडप्पा-मोहनजोदड़ो देखील याच सिंधू नदीच्या खो-यात विकसित झाली. या लोकांना ग्रीक लोकांनी इंडोई असे नाव दिले. म्हणून या संस्कृतीला इंडस सिव्हिलायजेशन असे संबोधले जाऊ लागेल. त्यातूनच पुढे 'India' हा शब्द उदयाला आला. संस्कृत भाषेमध्ये आपला भारत देशाचा उल्लेख भारतीय गणराज्य म्हणून केला जातो.
2. आपला राष्ट्रध्वज सर्वात पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकावला गेला नसून 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकत्त्यामधील पारसी बागान स्क्वेअर मध्ये फडकावला गेला.
3. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते, मात्र नेहरूंना दुस-या क्रमांकावर येणे रुचले नाही, तर दुसरीकडे महात्मा गांधींना नेहरूंविषयी थोडी जवळीक होती. म्हणून पटेलांना मागे टाकून नेहरु पंतप्रधान झाले.
हेही वाचा- भारतासह 'या' 4 देशांना 15 ऑगस्ट रोजी मिळाले होते स्वातंत्र्य, जाणून घ्या
4. महात्मा गांधी यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाचे डिझाईन बनवले होते असे सांगितले जाते मात्र तसे नसून थोर स्वातंत्र्य सैनिक पिंगली वेंकैया यांनी डिझाईन केले होते.
5. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे भगतसिंह यांना पंजाबी भाषेसह हिंदी, फ्रेंच, स्वीडिश, इंग्रजी, अरेबिक या भाषांचेही ज्ञान होते.
15 ऑगस्ट दिवशी सर्वच ठिकाणी आपला तिरंगा फडकवत एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या या देशाच्या झेंडयामध्ये तीन रंग आहेत म्हणूनच आपण याला तिरंगा म्हणतो. हा तिरंगा आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो. यामधील प्रथम केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामधील निळ्या रंगाचे अशोकचक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे.