Independence Day (Photo Credits-Twitter)

भारताला (India) स्वातंत्र्य मिळून यंदा सर्वत्र 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा (Independance Day) करण्यात येणार आहे. इंग्रजांची् गुलामगिरी भारताने जवळजवळ 200 वर्षे सहन केल्यानंतर भारत स्वतंत्र्य झाला. परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतासह हे 4 देश स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करतात. या देशांनासुद्धा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले होते.

भारतासह दक्षिण कोरिया (South Korea), बहरीन (Bahrain), लिकटेंस्टीन (Liechtenstein) आणि कांगो (Cango) या चार देशांचा समावेश आहे. या दिवशी हे देश स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करतात. दक्षिण कोरियाने जपानकडून 1945, बहरीनने ब्रिटेनकडून 1971, लिकटेंस्टीन या देशाने जर्मनीकडून 1866 आणि कांगोने फ्रान्सकडून 1960 रोजी स्वातंत्र्य मिळवले होते. त्यामुळे या देशात 15 ऑगस्ट रोजी आनंद साजरा केला जातो.(Pingali Venkayya Jayanti: भारतीय राष्ट्रध्वज साकारणार्‍या पिंगली वैंकय्या यांच्याबद्दल खास गोष्टी)

असे सांगितले जाते की, ब्रिटेन भारताला 1947 नाही तर 1948 मध्ये स्वातंत्र्य देण्याच्या तयारीत होता. मात्र महात्मा गांधी यांनी केलेल्या भारत छोडो आंदोलनाला कंटाळून इंग्रजांनी भारताला 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी 1930 पासूनच प्रयत्न सुरु करण्यात आले होते. परंतु 1929 मध्ये लाहौर सत्र सुरु असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्य घोषणेचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती.