Pingali Venkayya (Photo Credits : commons.wikimedia)

Pingali Venkayya Birth Anniversary: भारताचा तिरंगा हा आपली शान आहे. राष्ट्रभक्तीचं प्रतिक असलेल्या या राष्ट्रध्वजाचं एक विशेष महत्त्व आहे. हा राष्ट्रध्वज बनवणार्‍या पिंगली वैंकय्या (Pingali Venkayya) यांनी आपला राष्ट्रध्वज बनवला आहे हे मोजक्याच लोकांना ठाऊक असेल. आज पिंगली वैंकय्या यांची जयंती आहे. त्यांच्या जन्म दिनी जाणून घ्या पिंगली वैंकय्या यांनी साकारलेल्या तिरंग्याच्या डिझाईन. कापसावरील संशोधनामध्ये वैंकय्या यांना विशेष स्वारस्य होते त्यामुळे त्यांची ओळख कॉटन वेंकैया अशी देखील होती. 2 ऑगस्ट 1876 हा त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या जयंती निमित्त जाणून घ्याया काही खास गोष्टी

पिंगली वैंकय्या जेव्हा 19 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी 'ब्रिटीश आर्मी' मध्ये प्रवेश घेतला होता. पुढे त्यांनी आफ्रिकेत अ‍ॅग्लो-बोएर चळवळीत सहभाग घेतला. तेथेच त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. पिंगली यांचे शालेय शिक्षण भटाला पेनमरू आणि मछलीपट्टनम येथे घेतले. त्यानंतर ते मुंबईमध्ये आले. पुढे त्यांना दक्षिण आफ्रिकेले पाठवण्यात आले.

1899-1902 मधील दक्षिण आफ्रिकेच्या बायर युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळेस त्यांची भेट महात्मा गांधींसोबत झाली. त्यांच्या विचारांनी प्रभावित पिंगली वैंकय्या स्वदेशात म्हणजेच भारतामध्ये परतले. येथे त्यांनी मुंबईत रेल्वे गार्डची नोकरी केली.

पिंगली वैंकय्या यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज अशी ओळख आणि मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने 22 जुलै 1947 रोजी तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.

भारताचा तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकताना पाहणं ही पिंगली यांची इच्छा अपूर्णच राहिली. आर्थिक चणचणीमुळे त्यांच्या कुटुंबाकडे दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नव्हते.