थंडीचे दिवस सुरु होताच वजन हळूहळू वाढत चालल्याचे दिसून येते. ज्यास्तकरुन लोकांना थंडीत वजन वाढण्यामागील कारण हे फास्ट फूडचे खूप सेवन केल्याने असे होते. त्यामुळे तुम्हाला जर थंडीत तुमचे वजन नियंत्रित ठेवाचे असेल तर या पद्धतींचा उपयोग करा आणि तंदुरुस्त रहा.
व्यायाम न करणे
थंडीतील वातावरणात बदल झाल्याने लोक आळसावलेली दिसून येतात. त्यात दररोजच्या व्यायाम करण्यापासून दूर राहिल्याने व्यायाम करण्याचा थंडीत कंटाळा येतो. त्यामुळे व्यक्तीच्या शरीराची हालचाल जास्त प्रमाणात न झाल्याने वजन हळू हळू वाढण्यास सुरुवात होते.
जास्त झोपणे
थंडीच्या दिवसात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. त्यामुळे आपण थंडीत खूप वेळ झोपून राहतो. परंतु जास्त वेळ झोपल्याने दैनंदिन कार्यक्रम करण्याच्या वेळा बदलून जातात. अशा स्थितीत व्यक्तीला कंटाळा येऊन अजून काही वेळ झोपावेसे वाटते. ज्यामुळे वजन वाढण्याच्या क्रियेत ही बदल होण्यास सुरुवात होते.
थंडीतील खाणं
थंडीत मिळणाऱ्या फळांसोबत लोक मसालेदार जेवण जास्त खातात. यामुळे शरीराती चरबी वाढते. तर चहाचे पिण्याचे प्रमाण वाढून त्यासोबत गरमगरम भजी किंवा तेलकट पदार्थ खाण्याचे प्रमाण ही वाढते. तसेच तेलकट पदार्थांचे थंडीच्या दिवसात जास्त सेवन केल्यास वजन ही वाढते.
मेटाबॉलिझम वाढवणे
मेटाबॉलिझम वाढवल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच या प्रक्रियेत फरक पडल्यास वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर थंडीत मेटाबॉलिझम वाढण्याची गती अधिक वेगाने होते.
सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर
काही संशोधनाच्या अभ्यासातून बाकी ऋतुपेक्षा थंडीत खूप भूक लागल्याने खाण्याचे प्रमाण जास्त वाढते. या स्थितीला 'सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर' असे ही म्हटले जाते.
या पद्धतीने वजन करा नियंत्रित
-थंडीत जास्त प्रमाणात उच्च प्रथिने असेल असा नाश्ता करावा.
-व्यायामाचा कंटाळा करु नका. तर कार्डियो एक्ससाईज करणे उत्तम ठरेल.
-पोषक तत्व असणाऱ्या अन्न पदार्थांचे सेवन करणे.
-अल्कोहोल, कार्बोहायड्रेट आणि गोड पदार्थ खाण्यापासून दूर राहणे.
-थंडीत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी झोपण्याची पद्धतीत बदल करावा.
-जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. त्यामुळे शरीराला उर्जा प्राप्त होईल आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होईल.
-थंडीत ग्रीन टी प्यायल्यास शरीरासाठी उत्तम ठरेल.