Maharashtra Weather : हवामान खात्याकडून राज्यात (Maharashtra Weather)काही भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Unseasonal Rain) वर्तवण्यात आली आहे. तर, काही भागात उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई परिसरात तापमानामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणातही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळे कोकणात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस (Rain Alert) पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. (हेही वाचा :Maharashtra Weather : राज्यात येत्या 48 तासांत तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता; सोलापुरात सर्वाधीक तापमानाची नोंद, पारा 39 अंशांवर)
मुंबईतही कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. पहाटे धुके, दुपारी उन्हाचा चटका, असे वातावरण सध्या मुंबईत अनुभवायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसात मुंबईसह उपनगरातील तापमानात वाढ होणार आहे.
राज्यात सर्वांनाच मे चा पहिला आठवडा तापदायक ठरणार आहे. मे च्या सुरूवातीला सर्वत्र उष्णतेची लाट कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. वाढत्या उकाड्यापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्याचं आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलं आहे.