Rajmata Jijau Jayanti 2026 Quotes In Marathi: स्वराज्यप्रेरक राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची 428 वी जयंती 2026 मध्ये दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे १२ जानेवारी रोजी तारखेनुसार शासकीय जयंती साजरी केली जाईल, तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष पौर्णिमेला पारंपारिक पद्धतीने जन्मोत्सव साजरा होतो. 2026 मध्ये तिथीनुसार ही जयंती ३ जानेवारी रोजी येत आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे जन्मलेल्या जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत शिवरायांना घडवले. त्यांनी केवळ संस्कारच दिले नाहीत, तर न्यायाची चाड आणि स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. आजही त्या महाराष्ट्रातील लाखो महिला आणि तरुणांसाठी प्रेरणेचा मुख्य स्त्रोत आहेत.

तिथीनुसार जयंती आणि मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार, राजमाता जिजाऊ यांचा जन्म पौष शुद्ध पौर्णिमेला झाला होता. २०२६ मध्ये पौष पौर्णिमा ही शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी आहे.

पौर्णिमा तिथी प्रारंभ: २ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६:५३ वाजता.

पौर्णिमा तिथी समाप्ती: ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३२ वाजता. या दिवशी राज्यभरातील अनेक गड-किल्ल्यांवर आणि संस्थांमार्फत पारंपारिक पद्धतीने पूजा व पाळणा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

"मुजरा माझा त्या माँ जिजाऊला, ज्यांनी घडवले शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, जिच्या पोटी जन्मला स्वाभिमानी राजा शिवाजी."

राजमाता जिजाऊ जयंती फोटो

"मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. स्वराज्य उभे राहिले जिच्या संस्कारांनी, त्या माऊलीला त्रिवार वंदन."

राजमाता जिजाऊ जयंती शायरी

"जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि शंभू छावा... तुमच्या प्रेरणेशिवाय आम्हाला मिळाला नसता स्वराज्याचा ठेवा."

राजमाता जिजाऊ जयंती स्टेटस

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते हे केवळ माता-पुत्राचे नसून ते गुरु-शिष्याचे आणि एका महान स्वप्नद्रष्ट्या मार्गदर्शकाचे होते. जिजाऊंनी शिवरायांना केवळ रामायण-महाभारतातील शौर्यकथाच सांगितल्या नाहीत, तर त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि 'स्वराज्य' स्थापनेची प्रेरणा निर्माण केली.