Santacruz Private Part Attack: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातून एक थरारक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणीने वादातून आपल्या 24 वर्षीय प्रियकरावर चाकूने हल्ला करत त्याच्या गुप्तांगावर वार केले आहेत. या गंभीर हल्ल्यात तरुण रक्तबंबाळ झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किरकोळ वादातून टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि आरोपी तरुणी सांताक्रूझ परिसरात एकत्र होते. संवादादरम्यान त्यांच्यात काही खासगी कारणावरून तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यावर तरुणीने घरातील चाकू उचलला आणि प्रियकराच्या गुप्तांगावर वार केले. घटनेनंतर तरुणाने आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
या प्रकरणातील पीडित , पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, या घटनेमागील सविस्तर तपशील आता समोर आला आहे. पीडित दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला विवाहित असून तिचे लग्नापूर्वी जोगिंदरसोबत प्रेमसंबंध होते.
पीडिताने जबाबात नमूद केलेले मुख्य मुद्दे:
लग्नानंतर झाले होते विभक्त: संबंधित महिलेचे लग्न झाल्यानंतर त्या दोघांनी आपले संबंध संपवले होते आणि ते एकमेकांपासून विभक्त झाले होते.
भेटीसाठी वारंवार दबाव: लग्नानंतरही ती महिला पीडितला वारंवार फोन करून भेटीसाठी बोलावत होती. मात्र, पीडित आपल्या मुलांचे आणि कुटुंबाचे कारण देत तिला भेटण्यास स्पष्ट नकार दिला होता.
नव्या वर्षाच्या दिवशी बोलावले घरी: नवीन वर्षाच्या निमित्ताने त्या महिलेने पीडित मुद्दाम आपल्या घरी बोलावून घेतले. तो घरी आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि त्याच वेळी तिने चाकूने त्याच्या गुप्तांगावर वार केले.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत जोगिंदरने त्या महिलेच्या घरातून पळ काढला आणि स्वतःच उपचारासाठी रुग्णालय गाठले.
रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरुणाचा जबाब नोंदवला आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.