प्रत्येकाला उत्तम आरोग्य रहावे अशी फार इच्छा असते. मात्र यासाठी नियमित योगासने किंवा व्यायाम केल्याने आरोग्याचा त्याचा भरपूर फायदा होते. खासकरुन योगा करणे हे सर्वात फायदेशीर बाब असून भविष्यात होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. पुरुषांपेक्षा महिलांना अधिक आरोग्यासंबंधित विकार होत असल्याचे काही वेळा दिसून येते. महिलांना चाळीनंतर पाठ, हातपाय, घुडघे दुखण्याच्या समस्या उद्भवू लागतात. अशा वेळी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासोबतच योग साधना करणे फायदेशीर ठरु शकते.
योगासाधनेत विविध प्रकार असून शरीराच्या प्रत्येक भागासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे जर तुम्ही चाळीच्या वयातील महिला असाल तर हे काही योगासने फायदेशीर ठरु शकतात. तर जाणून घ्या कोणती आहेत ती योगासने.
सुखासन:
सुखासन केल्याने शारिरीक आणि मानसिक शांती मिळते. हे योगासन करण्यापूर्वी केली जाते. सुखासन करण्यासाठी पाय दुमडून बसावे आणि डोळे बंद करुन हात पायांवर ठेवावे.
ताडासन:
हे आसन करण्यासाठी ताठ उभे रहावे. त्यानंतर तुमचे हात सरळ रेषेत वरती करत मोठा श्वास घ्यावा. तसेच डोळे बंद करावे. त्यानंतर घेतलेला मोठा श्वास हळूहळू सोडावा.(उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दररोज 'ही' 5 योगासने करा)
या दोन योगासनांसह उत्तासन सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. त्याचसोबत एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब ही समस्या असणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. तसेच उच्च रक्तदाब असलेली वक्ती जरी थोडे अंतर चालले तरीही दम लागतो. त्यामुळे या समस्येपासून दूर राहण्यासाठी साम वृत्ति,कपालभाती. अनुलोप विलोम, सीताकारी, मोठा श्वास घेणे अशी योगासने करणे फायद्याचे ठरणार आहे.