प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Hypertension म्हणजेच उच्च रक्तदाब  होय. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या फार वाढू लागली आहे. मात्र तरुणांमध्ये ही उच्च रक्तदाब दिसून येतो. तणाव, बदलती जीवनशैली किंवा खाण्यापिण्याची सवय यांमुळे सुद्धा उच्च रक्तदाबाचा परिणाम आरोग्यावर होतो.

परंतु उच्च रक्तदाब ही समस्या असणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. तसेच उच्च रक्तदाब असलेली वक्ती जरी थोडे अंतर चालले तरीही दम लागतो. त्यामुळे या समस्येपासून दूर राहण्यासाठी दररोज ही 5 योगासने जरुर करा.

>>साम वृत्ति:

साम वृत्ति हे योगासन करताना सरळ श्वास घेत रहा. त्यामुळे तुम्हाला आराम आणि मन शांत करण्यास मदत होईल. ज्यामुळे रक्तदाब कमी होईल. मात्र झोपण्यापूर्वी योगासन केल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

>>कपालभाती

कपालभाती आरोग्यासाठी उत्तम योगासन आहे. मात्र सकाळी उपाशी पोटी कपालभाती हे योगासन केल्याने रक्त डिटॉक्स करण्यास मदत होते. तसेच उच्च रक्तदाब आणि अन्य आजारांपासून मुक्तता मिळते.

>>अनुलोम विलोम

अनुलोम विलोम हे योगासन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. एवढेच नाही तर मधुमेहाचा त्रास सुद्धा कमी होतो.

>>सीताकारी

सीताकारी या योगासनाच्या माध्यमातून रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच तणाव सुद्धा कमी होतो.

>> डीप ब्रिदींग

डीप ब्रिदींग या योगासनाचा शोध जपानमध्ये एका अभ्यासाच्या माध्यमातून लागला आहे. यामध्ये श्वासावर असणाऱ्या नियंत्रणामुळे उच्च रक्तदाब प्रमाणात राहते.(जिमला जाण्यापूर्वी या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष नाहीतर शरीरावर होऊ शकतो विपरित परिणाम)

त्यामुळे वरील योगासने नियमित केल्यास त्याचे परिणामसुद्धा तुम्हाला दिसुन येतील. मात्र योगासन करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने ती करावी.