WB Murder Case: पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील कुलपी येथे एका व्यक्तीला लोकांच्या गटाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कुणाल अध्या (22) हा घरी परतत असताना शनिवारी रात्री रामकृष्णपूर ग्रामपंचायतीच्या कलिताळा परिसरात ही घटना घडली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक क्लबशी संबंधित वादातून कुणालला प्रतिस्पर्धी गटाच्या सदस्यांनी मारहाण केल्याच्या वृत्ताची पोलीस चौकशी करत आहेत. हे देखील वाचा:Viral Video: स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेने रेल्वे रुळावर बनवली रील, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
पोलिसांनी सांगितले की, कथित हल्ल्यादरम्यान, कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.