
DC vs RR IPL 2025 32nd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 32 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium, Delhi) खेळवला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने दिल्लीला 12 धावांचे लक्ष्य दिले होते. जे दिल्लीने 4 चेंडूत साध्य केले. संदीप शर्माच्या तीन चेंडूत चौकाराच्या मदतीने केएल राहुलने 7 धावा केल्या. यानंतर, ट्रिस्टन स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारला आणि दिल्लीला सामना जिंकून दिला.
𝙏𝙧𝙪𝙨𝙩-𝙄𝙣 𝙎𝙩𝙪𝙗𝙗𝙨 😎
An emphatic way to seal a famous victory 🔥#DC fans, you can breathe now 😅
Updates ▶ https://t.co/clW1BIQ7PT#TATAIPL | #DCvRR | @DelhiCapitals pic.twitter.com/2jgxDegvxS
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
अभिषेक पोरेलने 49 धावांची दमदार खेळी
त्याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून दिल्ली फलंदाजीसाठी अंमत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 188 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेलने सर्वाधिक 49 धावांची दमदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 37 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला. त्याच्या व्यतिरिक्त, केएल राहुल 38 तर अक्षर पटेलने 34 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स कडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने जिंकला सामना
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत चार गडी गमावून फक्त 188 धावा करता आल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने दिल्लीला 12 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने एकही विकेट न गमावता अवघ्या चार चेंडूत लक्ष्य गाठले.